सुलतानपूर, पुढारी वृत्तसेवा : गोठ्यात बांधलेल्या जनावरावर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्यांचा फडशा पडला आहे. ही घटना सोमवार दि.3 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव शिवारातील घडली आहे घडली. 20 ते 25 हजाराचे नुकसान झाले असल्याची माहिती शेळ्यांचे मालक मच्छिंद्र उबाळे यांनी दिली आहे.
घडलेले घटनेची माहिती मच्छिंद्र उबाळे यांनी वनरक्षक सुभाष मातेरे यांना कळवल्यानंतर मातेरे यांनी पशुवैद्यकीय कर्मचारी संदीप घुले यांच्यासह घटनास्थळी जाऊन झालेल्या घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान घडलेल्या घटनेमुळे खांडी पिंपळगाव सह परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी शेतीला पाणी कसे पाजावे ? हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.