ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधान आलं होतं पण काही दिवसांनी या अफवा बंद झाल्या. मात्र आता एक नवीच वाद समोर आला आहे. पण तो ऐश्वर्या राय आणि अभिषेकचा नाही तर त्यांची लेक आराध्याबद्दल. आराध्या बच्चनच्या तब्येतीबाबत चुकीच्या बातम्या दिल्याप्रकरणी बच्चन कुटुंब संतप्त झालं असून याबद्दल थेट हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
काही यूट्यूब चॅनलने आराध्याच्या तब्येतीबाबत अफवा पसरवल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आराध्या आजारी असल्याच्या अशा खोट्या गोष्टी व्हिडिओंमध्ये सांगण्यात आल्या होत्या. या फेक न्यूजमुळे संतापलेल्या बच्चन कुटुंबाने 2023 मध्ये हायकोर्टात याचिका दाखल करून असे व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी केली होती. अशा रिपोर्टिंगवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
2023 मध्ये आराध्या अल्पवयीन असल्याचे सांगून. अशा खोट्या बातम्या देणं बंद करण्याबद्दल मागणी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने आराध्या बच्चनच्या प्रकृतीशी संबंधित सर्व व्हिडिओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे निर्देशही दिले होते. मात्र आता पुन्हा एकदा याच प्रकरणाबाबत पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला.
बच्चन कुटुंब संतप्त
2025 मध्ये आराध्याचे पालक म्हणून ऐश्वर्या राय आणि अभिषेकने दिल्ली उच्च न्यायालयात पुन्हा नव्याने अर्ज दाखल केला आहे. या नव्या अर्जानुसार दिल्ली उच्च न्यायालयाने गुगलसह काही वेबसाइटला नोटीस पाठवली आहे.
आराध्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, काही यूट्यूबर्स अद्याप हजर झाले नाहीये तसेच त्यांचा बचाव करण्याचा अधिकार आधीच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा 17 मार्च रोजी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
आराध्याने ती अल्पवयीन असल्याचं सांगत…
आराध्या बच्चन सध्या 13 वर्षांची आहे. 2023 मध्ये आराध्याने स्वत: देखील ती अल्पवयीन असल्याचं कारण देत अशा खोट्या रिपोर्टिंगवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता सुनावनीनंतर या प्रकरणाबाबत काय नवीन अपडेट समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान 2007 मध्ये ऐश्वर्या-अभिषेकचे लग्न झाले होते आणि त्यांच्या लग्नाच्या चार वर्षानंतर 2011 मध्ये आराध्याचा जन्म झाला.
आराध्याचे शिक्षण
आराध्याला अनेकदा तिच्या आईसोबत स्पॉट केलं जातं. काही महिन्यांपूर्वी आराध्याच्या शाळेत एक कार्यक्रम होता, ज्यामध्ये आराध्याने परफॉर्मही केलं होतं. अभिषेक-आराध्यासोबत अमिताभ बच्चनही त्यांच्या नातीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी आले होते. आराध्या मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते.