Published on
:
03 Feb 2025, 11:00 am
Updated on
:
03 Feb 2025, 11:00 am
केज: पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवाशी असलेल्या एका ३० वर्षीय मौलाना यांचा धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर मृत्यू झाला. हा घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. (Beed News)
केज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवाशी असलेले मौलाना मुस्तकिन जब्बार शेख हे धाराशिव जिल्ह्यातील मोहा येथे धार्मिक शिक्षण देण्याचे काम करीत होते. दरम्यान, त्यांनी काही दिवस बाहेरगावी जात असल्याचे सांगून मोहा येथून रविवारी (दि. २) फेब्रुवारी रोजी बाहेरगावी गेले होते. त्यानंतर मध्यरात्री धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर त्यांचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला. (Beed News)
दरम्यान, त्यांचा खून झाला असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे. तसेच वाशी पोलिसांनी संशयित म्हणून काहींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते आहे. तर मौलाना मुस्तकीन शेख यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.