अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटांप्रमाणेच खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो. मलायकासोबत ब्रेकअपनंतर तर अर्जुन कपूरच्या प्रत्येक गोष्टींबद्दल चर्चा होते. मग त्याची साधी इन्स्टा पोस्ट असली तरीही त्याचा संबध लगेच मलायकाशी जोडला जातो.
मलायका अर्जुनचे ब्रेकअप होऊन आता बरेच महिने झाले. त्यांचं नात जेवढं चर्चेत राहिलं नाही तेवढा त्यांचा ब्रेकअप चर्चेत राहिला आहे. अर्जुनने एका कार्यक्रमात त्यांच्यातील नाते आता संपले आहे यावर भाष्यही केलं होतं. पण तरीही चाहते, किंवा कोणत्याही इव्हेंटमध्ये, चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यानही अर्जुन कपूरला त्याच्या नात्याविषयी विचारलच जातं. सध्या असाच एक किस्सा घडला.
अर्जुनला थेट त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आला प्रश्न
एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याला थेट त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आला आणि त्यावर अर्जुननेही प्रतिक्रिया दिली आहे. तो प्रसंग होता त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा. अर्जुन कपूर , रकुल प्रीत सिंग आणि भूमी पेडणेकर यांचा आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘मेरे हसबंड की बीवी’च्या रिलीजपूर्वी ही टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
अर्जुनने लग्नाच्या प्लॅनबद्दल स्पष्ट सांगितलं
याच प्रमोशनल इव्हेंटमध्ये अर्जुनला खऱ्या आयुष्यात लग्न करण्याच्या त्याच्या योजनांबद्दल विचारण्यात आलं. यावेळी , तो म्हणाला, “जेव्हा मी तो निर्णय घेईल तेव्हा मी तुम्हा सर्वांना कळवीन. आज आपण चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. तर त्याबद्दल बोलुया. मला वाटतं की मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल संभाषण आणि गप्पा मारण्याची परवानगी दिली आहे. पण जेव्हा मी त्याबद्दल कम्फर्टेबल असेल तेव्हा”
‘जेव्हा ती योग्य वेळ असेल,….’
तसेच तो पुढे म्हणाला, “जेव्हा मी लग्नाबद्दल प्लॅन करेल आणि जेव्हा ती योग्य वेळ असेल, तेव्हा मी तुम्हा सर्वांसोबत ती बातमी शेअर करायला मागेपुढे पाहणार नाही. एक व्यक्ती म्हणून मी कसा आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. आत्ता मला माझ्या ‘मेरे हसबंड की बीवी’ सेलिब्रेट करू द्या.” असं म्हणत अर्जुनने त्याच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल सांगितलं. तसेच यापुढे याबद्दल सारखं विचारण्याची आवश्यकता नाही अशाप्रकारचा इशाराही त्याने दिला.
अर्जुन कपूरचा ‘मेरे हसबंड की बीवी’ हा चित्रपट लवकरच
दरम्यान अर्जुन कपूरचा ‘मेरे हसबंड की बीवी’ हा चित्रपट येत आहे. चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये भूमी आणि रकुल घोड्यावर बसलेले दिसत आहेत तर, अर्जुन त्यांच्या मध्ये उभा असलेला दिसत आहे.
अर्जुनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर केलं आहे . तसेच कॅप्शनमध्ये, “खेंचो… और खेंचो!!! शराफत की यही सजा होती है… कलेश हो या संघर्ष, फस्ता तो मुझ जैसा आम आदमी है #MereHusbandKiBiwi In Cinemas. 21 फेब्रुवारी 2025.” असं लिहिलं आहे.
21 फेब्रुवारी 2025 चित्रपट रिलीज होणार
मुदस्सर अझीझ दिग्दर्शित या चित्रपटात शक्ती कपूर, अनिता राज, दिनो मोरिया आणि आदित्य सील यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत. हा एक कॉमेडी जॉनरचा चित्रपट आहे. 21 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार प्रेक्षकांना आतापासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता असल्याचं दिसत आहे.