पिंपरी मंडईत पालेभाज्यांचे दर 10 ते 15 रुपये गड्डी असून कोथिंबीर, कांदापात, पालक, पुदिना आणि हरभरा गड्डीची विक्री तेजीत राहिली. प्रतवारीनुसार, कांदा 20 ते 30 रुपये, बटाटा 20 ते 25, लसूण 150 ते 200, आले आणि मिरची 50 ते 60, 20, गाजर आणि मटार 40 रुपये प्रतिकिलो असल्याचे विक्रेते जाकिर मुजावर यांनी सांगितले. काही फळांचे भाव कमी झाले असून कलिंगड 20 तर टरबूज 50 ते 60 रुपये आणि डाळिंब 200 रुपये किलोने विक्री होत असल्याचे फळविक्रेते महेंद्र यादव यांनी सांगितले.
मोशी उपबाजारातील फळभाज्यांची आवक आणि सरासरी भाव कंसात याप्रमाणे- कांदा 388 क्विंटल- (1300 रु.); बटाटा 514 क्विंटल- (750 रु.); टोमटो- 567 क्विंटल- (750 रु.); मटार 403 क्विंटल-(3500 रु.); आले 35 क्विंटल-(2500 रु.); भेंडी 78 क्विंटल-(3500 रु.); मिरची 184 क्विंटल-(3000 रु.); फ्लॉवर 375 क्विंटल-(900 रु.); कोबी 241 क्विंटल-(900 रु.); ढोबळी मिरची 65 क्विंटल-(3000 रु.); वांगी 135 क्विंटल-(2500 रु.); बीट 18 क्विंटल-(2500 रु.); काकडी 168 क्विंटल-(1500 रु.); दुधी भोपळा 71 क्विंटल-(1500रु.); कारली 22 क्विंटल-(3500 रु.); घेवडा 53 क्विंटल-(4500 रु.); गाजर 182 क्विंटल-(2500 रु.); शेवगा 27क्विंटल-(6000 रु.) लिंबाची आवक 42 क्विंटल झाली असून किमान भाव 5 हजार रुपये तर कमाल भाव सहा हजार रुपये राहिला. मका कणसाची आवक 38 क्विंटल तर भाव 1500 ते 1800 च्या दरम्यान होता.