कर्ज, वीजमाफी आश्वासनामुळे विदर्भात महायुतीला मताधिक्य:लाडक्या बहिणींची मिळाली भक्कम साथ

2 hours ago 1
लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा झाल्याने त्यांनी महायुतीला साथ दिली तर कर्जमाफी, वीजमाफीच्या आश्वासनाने शेतकरी भावांची नाराजी दूर झाली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीने सपाटून मार खाल्ला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजप व त्यांच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरला. सूक्ष्म नियोजन केले. लाडकी बहीण योजना आणली. प्रत्येक महिलेच्या खात्यात १५०० रुपये जमा केले. सरकार आल्यास २१०० रुपये देऊ असे आश्वासन दिले त्यामुळे महिलांनी महायुतीला कौल दिला. २०१९ च्या तुलनेत १२ जागा वाढल्या. ३६ वरून त्या ४८ झाल्या. एकट्या भाजपच्या ८ जागा वाढल्या. विक्रमी सभा घेऊनही महाविकास आघाडीने सपाटून मार खाल्ला. केवळ १४ जागांवर समाधान मानावे लागले. २०१९ मध्ये एकट्या काँग्रेसच्या १५ जागा होत्या. या वेळी ५ घटल्या. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे तसेच प्रहारचे बच्चू कडू हेही पराभूत झाले. विदर्भात हे तीन फॅक्टर ठरले प्रभावी हिंदू मते एकवटली, ‘आरएसएस’ प्रभावी ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’ या नाऱ्याने हिंदू एकवटले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघही मैदानात उतरल्याने त्याचा फायदा भाजपला झाला. शेतकऱ्यांची नाराजी कर्जमाफीने झाली दूर सोयाबीन व कापसाला रास्त भाव नसल्याने शेतकरी नाराज होता, मात्र महायुतीच्या कर्जमाफी व वीजमाफी आश्वासनामुळे ती दूर झाल्याचे दिसते. लाडक्या बहिणींची सर्वाधिक मते युतीला लाडक्या बहिणींनी आपली सर्वाधिक मते महायुतीच्या पदरात टाकल्याने विदर्भात घवघवीत यश मिळाले. सर्वाधिक फायदा भाजपला झाला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article