कर्तृत्ववान नवदुर्गांचा सन्मान करत अक्कलकोट संस्थानचा शाही दसरा:ऐतिहासिक राजवाड्यात शाही परंपरेप्रमाणे निघाली मिरवणूक

4 days ago 3
अक्कलकोट संस्थानचा शाही दसरा श्रीमंत मालोजीराजे भोसले (तिसरे) यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. ऐतिहासिक जूना राजवाडा येथे पारंपारिक पध्दतीने शस्त्र पूजन आणि सिमोल्लंघन झाल्यानंतर विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. अक्कलकोट संस्थांनचा दसरा महोत्सवाची परंपरा श्रीमंत मालोजीराजे राजे भोसले यांनी जपली. दसरानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुना राजवाडा पासून ते शरणमठापर्यंत राजघराण्याच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे रॅली काढण्यात आली. शरणमठ येथील शमी वृक्षाचे पूजन केल्यानंतर परत जुना राजवाडा येथे मुख्य सोहळा पार पडला. सिमोल्लंघन नंतर नागरिक आणि राजे यांनी शुभेच्छा दिल्या. उघड्या जीपमधून मार्गावरून जात असताना नागरिकांच्या वतीने जागोजागी सत्कार आणि पुष्पवृष्टी केली. यावेळी राजमाता जयप्रभादेवी भोसले, आशिष कदम, पुजा चौबे यांच्या सह बारा मानकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्र निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रचिती पाटील , द्वितीय शिवानी भोसले, तृतीय श्रेया अक्कलकोट शहर तालुक्यात नवरात्रोत्सव निमित्त ११२ सार्वजनिक मंडळातर्फे जागर करून शनिवारी दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवार पेठ येथील अंबाबाई मंदिर, बायपास चौक येथील टोल अंबाबाई, वेताळ चौक येथील यल्लम्मा मंदिर, अन्नछत्र मंडळ,राजेराय मठ, श्री वटवृक्ष स्वामी मंदिर, समाधी मठ आदीसह विविध सार्वजनिक नवरात्र मंडळ येथे दर्शन एकमेकांना आपट्यांची पाने देऊन शुभेच्छा दिल्या.सकाळी झेंडुची फुले घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागातही दसऱ्याचा उत्साह दिसून आला. देवीभक्तांनी पारंपारिक पध्दतीने सीमोल्लंघन झाल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अक्कलकोट संस्थानच्या वतीने दसरा महोत्सवात श्रीमंत मालोजीराजे भोसले (तिसरे) यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नवदुर्गा चा सत्कार करण्यात आला. माशाळ, उत्तेजनार्थ पहले मानसी खानोरे, व्दितीय उत्तेजनार्थ कन्याकुमारी पाकणीकर, तिसरे उत्तेजनार्थ पुष्पा खानापूरे यांचा राजेसाहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निमित्ताने विजयादशमी २०२४ चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जाजु याने दांडपट्टा फिरवुन मैदानी खेळ सादर केले. निरव पोतदार याने शिवगर्जना सादर केली. राजेसाहेब यांच्या हस्ते देवघरातील देवतांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राजघराण्यातील मानकऱ्यांचा परंपरे प्रमाणे सन्मान करण्यात आला. राजघराण्याच्या देवघरातील भवानी मातेच्या दर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. दसरा महोत्सवासाठी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यांचा झाला गौरव खेळाडू नागम्मा बजे, संगीत कलाकार कुंदा नकाते, शैक्षणिक रूपाली शहा, इतिहास संशोधिका डॉ. सुमती फडतरे, सामाजिक कार्यकर्ता सोनल जाजु, लेखिका आरती काळे, उद्योजिका वनिता तंबाखे, सीमाली कोळी डॉ. गिरीजा राजीमवाले तालुक्यात ११२ मंडळाकडून शक्तिदेवीचा जागर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article