काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची आज दिल्लीत बैठक:125 उमेदवारांच्या नावावर चर्चा, 17 ऑक्टोबरला उमेदवारांची यादी जाहीर होणार?

2 days ago 1
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. राज्यातील 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या घोषणेने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यातच महाविकास आघाडीत 220 जागांवर एकमत झाले आहे. तिन्ही पक्ष यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या या जागांवर उमेदवार निवडीची प्रक्रिया पुढे नेत आहेत. उर्वरित जागांवर महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये लवकरच एकमत होणार असल्याचे नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे उमेदवार निवडीसाठी काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक आज सायंकाळी 5 वाजता दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जवळपास समसमान जागांवर निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस एकटी 105 ते 110 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उमेदवारांची यादी लवकरच पाठवली जाईल महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाठिंब्याची लाट असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. राज्याला एनडीएपासून वाचवण्याचा अजेंडा घेऊन एमव्हीए निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नसीम खान म्हणाले की, काँग्रेसकडे सर्व जागांवर तगडे उमेदवार आहेत. लवकरच उमेदवारांची यादी काँग्रेस निवडणूक समितीकडे पाठवली जाणार आहे. प्रचारासाठी कमी वेळ निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेवर विरोधकांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रिया 35 दिवसांत पूर्ण करण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली असल्याचे विरोधकांनी सांगितले. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र विधानसभा सर्वात मोठी आहे. असे असतानाही एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. यंदा राज्यात 5 टप्प्यात लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणूक आयोग राजकीय पक्षांना उमेदवार ठरवण्यासाठी, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि प्रचारासाठी सुमारे 40 दिवसांचा अवधी देतो. पण, यावेळी आम्हाला 35 दिवस मिळाले आहेत. यामुळे आम्हाला प्रचारासाठी कमी वेळ मिळेल. विरोधकांना कमी वेळ देण्यासाठी नियोजनाचा हाही भाग असू शकतो. 125 उमेदवारांच्या नावावर चर्चा- 17 ऑक्टोबरला यादी? उमेदवार निवडीसाठी काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची आज सायंकाळी 5 वाजता दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात बैठक होणार आहे. यात 125 उमेदवारांच्या नावावर बैठकीत चर्चेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 17 ऑक्टोबरला काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यताही सुत्रांनी वर्तवली आहे. काल विजय वडेट्टीवारांच्या बंगल्यावर काँग्रेसची बैठक झाली. यातही काँग्रेसकडून 125 उमेदवारांच्या नावांची चाचपणी घेण्यात आली होती. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... मायावतींकडून महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याचा नारा:निवडणूक लढवणार असल्याची घोषणा; निष्पक्ष निवडणुकांची अपेक्षाही केली व्यक्त महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची काल घोषणा झाली असून त्यासोबतच राजकीय पक्षांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान, मायावतींच्या बहुजन समाज पक्षानेही मोठी घोषणा केली आहे. बसपा महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवेल, म्हणजेच महायुती किंव महाआघाडीत सामील होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा....

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article