कारकुनाचा मुलगा झाला श्रीलंकेचा राष्ट्राध्यक्ष

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

23 Sep 2024, 11:55 pm

Updated on

23 Sep 2024, 11:55 pm

मार्क्सवादी विचारसरणीचे खासदार अनुरा कुमारा दिसानायके ऊर्फ एकेडी यांनी श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यांची प्रतिमा भारतविरोधी असून, ते चीनचे कट्टर समर्थक मानले जातात. दरम्यान, शपथविधीनंतर मात्र त्यांनी भारताचे आभार मानून राजनैतिक आणि द्वीपक्षीय संबंध मजबूत करणार असल्याची भूमिका घेतली आहे. श्रीलंकेत प्रथमच डाव्या विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व सर्वोच्च स्थानावर विराजमान झाले. 2022च्या आर्थिक अरिष्टानंतर कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या श्रीलंकेतील राजकीय घडामोडींवर टाकलेला प्रकाशझोत...

दुसर्‍या टप्प्यातील ऐतिहासिक मतमोजणीत त्यांचे प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार साजिथ प्रेमदासा यांचा दिसानायके यांनी पराभव केला. दिसानायके हे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील सरकारी कारकून होते, तर आई या गृहिणी आहेत.

पहिल्या टप्प्यातील मतमोजणीत त्यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचा पराभव केला होता. श्रीलंकेच्या इतिहासामध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतमोजणी कधीही झाली नव्हती. शनिवारच्या मतमोजणीत एकाही उमेदवाराला 50 टक्क्यांपर्यंत मतदान न पडल्यामुळे निवडणूक आयोगाने दुसर्‍या टप्प्यातील मतमोजणी जाहीर केली होती.

अल्पसंख्याक तमिळींना विरोध

नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष दिसानायके हे चीनचे समर्थक म्हणून ओळखले जातात. राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याआधी त्यांनी भारतविरोधी भूमिका घेतली होती. भारतातील तमिळ अल्पसंख्याकांच्या हक्काच्या विरोधात त्यांची भूमिका आहे. तमिळींना हक्क देणार्‍या विधेयकाला त्यांनी विरोध केला होता. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मात्र त्यांनी भारताबद्दल सौम्य भूमिका घेतली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article