कुणाच्याही तंगड्यात तंगड्या नाही, सगळे निवांत:सरकार स्थापनेची चिंता आमच्यापेक्षा त्यांना जास्त, संजय शिरसाटांचा राऊतांवर निशाणा
2 hours ago
1
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांना रडत बसण्याऐवजी दुसरे काही काम नाही. कसे झाले, क्या से क्या हो गया? असे डायलॉग ते पाठ करत असतील. करावे तसे भरावे या म्हणीप्रमाणे आताची परिस्थिती त्यांच्या नशिबी आलेली आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली. आधी बेकायदेशीर सरकार बनत होते. आता कायदेशीर सरकार कधी स्थापन होणार, आमच्यापेक्षा जास्त चिंता त्यांना लागली आहे. आमचे सरकार कधी स्थापन करायचे, ते आम्ही ठरवू. तुम्ही फक्त घोषणा देण्याचे काम करा, असा सल्ला संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना दिला आहे. कुणाच्याही तंगड्यात तंगड्या नाही, सगळे निवांत
आमच्या कोणाच्याही तंगड्यात तंगड्या अडकलेल्या नाहीत. एकनाश शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सगळे नेते निवांत आहेत. हे तुम्हाला दोन-चार दिवसांत दिसून येईल. आमचे सरकार व्यवस्थित स्थापन होईल. सरकारचा शपथविधी वानखेडे सारख्या मोठ्या स्टेडियमवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही संजय शिरसाट म्हणाले. संजय राऊतांनी जनतेला गृहित धरले
भाजपचा शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो. कारण भाजपची शिवसेनेच्या बाबतीत गरज सरो वैद्य मरो अशी भूमिका असते, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. या टीकेवर बोलतान संजय शिरसाट म्हणाले, कोट्यवधी लोकांनी विश्वास ठेवला आहे. आज भाजपचे शिवसेनेचे एवढे आमदार का निवडून आले? त्यामागे काही कारण असेल की नाही. जनतेला गृहित धरण्याचा प्रकार फक्त संजय राऊत करू शकतात. जनता मुर्ख आहे, असे समजून हे राजकारण करत होते. आता जनतेनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. तुमचे चेहरे पाहण्याची इच्छा देखील लोकांची नसल्यामुळे भाजप-शिवसेनेला भरभरून मतदान दिले. तुम्ही आता तुमचा चेहरा आरशात पहावा, असा टोला संजय राऊत यांना लगावला. बार्गेनिंगच्या भानगडीत आम्ही पडणार नाही
अजित पवारांमुळे शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी झाली, असे वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले होते. त्यावरही संजय शिरसाट यांनी भाष्य केले. अजित पवारांमुळे आमची बार्गेनिंग पावर कमी होण्याचे काही कारण नाही. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अति घाईमध्ये पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. पण नंतर आम्ही पुन्हा सत्तेत आलो. महायुतीची सत्ता ही तिनही पक्षांची सत्ता आहे. त्यामुळे बार्गेनिंगच्या भानगडीत आम्ही पडणार नाही, असे संजय शिरसाट म्हणाले. हे ही वाचा... भाजपला पाशवी बहुमत मात्र, आता तंगड्यात तंगडे:पडद्यामागे एकमेकांच्या छातीवर बसण्याचे कार्यक्रम : संजय राऊत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या तिन्ही पक्षाचे तंगड्यात तंगडे अडकले आहे. एकमेकांच्या छातीवर बसण्याचे कार्यक्रम पडद्यामागे सुरू आहेत. मग तुम्हाला लोकांनी बहुमत कशासाठी दिले? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)