कॉन्ट्रॅक्टरच्या घरातून केअरटेकर महिलेने चोरले 25 लाखांचे दागिने:पूजेसाठी दागिने काढायला गेले अन् चोरी झाल्याचे लक्षात आले

3 days ago 3
शहरातील अंबापेठमध्ये राहणाऱ्या एका शासकीय कंत्राटदाराच्या घरी कंत्राटदाराच्या आईची सुश्रुषा करण्यासाठी एक केअर टेकर महिला येत होती. या महिलेने कंत्राटदाराच्या घरातील कपाटातून तब्बल ३३० ग्रॅम सोन्याचे दागिने ( किंमत २३ लाख १० हजार) व दोन किलो चांदी (किंमत १ लाख ८० हजार रुपये) असा एकूण २५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी संशयित केअरटेकर महिलेविरुद्ध कोतवाली पोलिसांनी रविवारी (दि. १३) गुन्हा नोंदवून तिला अटक करून ३० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. रतनदिपसिंग सतवंतसिंग बग्गा (४४, रा. अंबापेठ, अमरावती) असे तक्रारदार कंत्राटदारांचे नाव आहे. बग्गा हे शासकीय इलेक्ट्रिकल कंत्राटदार आहे. त्यांचे अंबापेठमध्ये घर आहे. त्यांच्या आईची सेवा, शुश्रूषा करण्यासाठी एक ३० वर्षीय महिला २८ ऑगस्ट २०२४ पासून त्यांची घरी येते. दरम्यान १२ ऑक्टोबरला दसरा असल्यामुळे बग्गा हे त्यांच्या आईच्या कपाटात असलेले सोन्याचे व चांदीचे दागिने काढायला गेलेत. त्यावेळी त्यांना दागिने दिसले नाही. त्यांना केअरटेकर महिलेवर संशय आला. दरम्यान १३ ऑक्टोबरला केअर टेकर महिला त्यांच्या घरी आली असता तिला दागिन्यांबाबत विचारणा केली तर मला माहीत नाही, असे सांगितले. दरम्यान त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस बग्गा यांच्या घरी येऊन त्यांनी महिलेची चौकशी करत तिच्या बॅगची तपासणी केली, त्यावेळी बग्गा यांच्या घरातील काही दागिने पोलिसांना सापडले. या प्रकरणी तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी त्या महिलेला अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी ३० ग्रॅम दागिने जप्त केले. तिला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता १८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या दरम्यान महिलेकडून अन्य काही दागिने जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी सांगितले आहे. दसऱ्यानिमित्त पूजेसाठी दागिने लागणार होते, म्हणून बग्गा हे त्यांच्या आईच्या खोलीतील कपाटातून दागिने काढण्यासाठी गेले, त्यावेळी त्यांना कपाटात दागिने नव्हते. त्यांनी घरात इतरत्र दागिन्यांचा शोध घेतला, मात्र दागिने कुठेही दिसले नाही. त्यामुळे केअरटेकर महिलेने दागिने चोरले असावे, असा संशय त्यांना आला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article