कौशल्य विद्यापीठास रतन टाटांचे नाव:प्रधानमंत्री आवास योजना 2.0 राबविणार, मंत्रिमंडळ बैठकीत धडाकेबाज 19 निर्णय

4 days ago 3
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्याआधी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचा तसेच प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यांसह एकूण 19 धडाकेबाज निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहे. घोषणा करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता ही महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक न्याय, जलसंपदा, महसूल, नगर विकास, सहकार, वैद्यकीय शिक्षण यासह ग्राम विकास विभागांशी संबंधित निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळात घेण्यात आलेले 19 निर्णय 1.मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ, आज रात्री 12 पासून अंमलबजावणी 2.आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय) 3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम 4.दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा) 5.आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा) 6.वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग) 7.राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल) 8.पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल) 9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल) 10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 राबविणार 11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास) 12.लकिल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार) 13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार) 14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची 3 पदे (वैद्यकीय शिक्षण) 15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण) 16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा) 17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट 18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास) 19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास) हेही वाचा... टोलमाफीचा निर्णय चुनावी जुमला नाही:मुख्यमंत्री शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर, सिद्दिकींवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा मुंबई एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यावर टोलमाफी करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या टोल माफीमुळे कारने प्रवास करणाऱ्या लाखो सामान्यांना दिलासा मिळणार आहे. या टोलमाफीद्वारे मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजनेचा शुभारंभ केला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच हा निर्णय निवडणुकीपुरता नसून पुढेही टोलमाफी राहणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article