क्राईम ब्रॅंच अधिकारी बोलत असल्याचे सांगत:मनी लॉड्रिंगच्या बहाण्याने 39 लाखांची आर्थिक फसवणूक

2 hours ago 1
मुंबई पोलीस मधून बोलत असल्याचे खोटे सांगून तुमच्या नावाने मनी लॉड्रिंग झाले असल्याचे खोटे सांगुन सर्व बँक खाते फ्रीज करण्याची भिती दाखवून तसेच मनी लॉड्रिंग बाबत चौकशी करण्याचा बहाणा करुन एका तरुणाची 37 लाखांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी राजवर्धन रेगुलगड्डा (वय 37, रा.विमाननगर, पुणे) याने अनोळखी मोबाईल वापरकर्ता व सर्व लाभार्थी बँक खातेधारक व वापरकर्ते यांचे विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना अनोळखी व्यक्तीने संपर्क करुन फेडेक्स कंपनी मुंबई येथून बोलत असल्याचे सुरुवातीला सांगितले. तसेच मुंबई क्राईम ब्रॅंच अधिकारी बोलत असल्याचे खोटे सांगून खोटे कागदपत्रे पाठवून व मुंबई पोलीसमध्ये काम करत असल्याचे भासवले. स्काईप अॅप मोबाईल मध्ये आरोपींनी डाऊनलोड करण्यास सांगून त्यात तक्रारदारांना सर्व डिटेल भरण्यास सांगून स्काईप आयडी सायबर क्राईम मुंबई ब्रँच यावरुन कॉल करुन तक्रारदारांच्या नावाने मनी लॉड्रिंग झाले असल्याचे आरोपींनी खोटे सांगितले. त्यांची सर्व बँक खाती फ्रीज करण्याची भीती दाखवून व मनी लॉड्रिंगबाबत चौकशी करण्याचा बहाणा करुन खात्यातील एकूण 39 लाख रुपये फसवणुकीच्या इराद्याने ऑनलाईन ट्रान्सफर करुन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. अशाचप्रकारे दुसरा गुन्हा चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून याबाबत संदीप रामचंद्र जाधव (वय-51, रा.बाणेर,पुणे) यांनी नऊ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. प्रदीप सावंत नावाचे अनोळखी व्यक्तीने त्यांना फोन करुन फेडेक्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदार यांचे नावे बेकायदेशीर पार्सल पाठविल्याचे सांगून त्याबाबत गुन्हा दाखल झाल्याचे खोटे सांगून तक्रारदार यांचे बँक खात्यावरुन प्री अप्रुड कर्ज घेऊन ते ट्रान्सफर करण्यास सांगून 9 लाख 12 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article