पुण्यात भाजपला बसणार मोठा धक्का:संजय काकडे पक्षाला सोडण्याच्या तयारीत, माजी आमदारही संपर्कात असल्याचा दावा

2 hours ago 1
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावरच मोठ्या धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. समरजितसिंह घाडगे, हर्षवर्धन पाटील या मोठ्या नेत्यांनंतर आता पुण्याचे संजय काकडे हे देखील आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे. संजय काकडे हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे संजय काकडे यांनी जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तर भाजपला मोठा फटका बसू शकतो. संजय काकडे यांनी याआधी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोशल मीडियावर पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. भाजपमध्ये मला कुठलेही काम नसून फक्त पदावर राहण्यात अर्थ नाही. त्यामुळे मंगळवारी भाजप राज्य उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असून काही माजी आमदार देखील संपर्कात असल्याचा त्यांनी दावा केला आहे. कोण आहेत संजय काकडे? संजय काकडे यांच्याकडे सध्या भाजप पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते राज्यसभेचे माजी खासदार देखील राहिले आहेत. अपक्ष खासदार म्हणून संजय काकडे यांनी भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करण्यास पाठिंबा दिला होता. संजय काकडे यांचा पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात समर्थक आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील मराठा चेहरा म्हणून संजय काकडे यांच्याकडे पाहिले जाते. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर संजय काकडे भाजपला रामराम थोकणार असल्याने भाजपला मोठा धक्का बसणार आहे. तसेच पुण्यातील मराठा समाज देखील भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजपला धक्के बसत आहेत, तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षात अनेक मोठ्या नेत्यांचे इनकमिंग सुरूच असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रात चांगलीच ताकद मिळत असल्याचे दिसत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article