खंडाळ्यात गतिरोधक नसल्याने अवजड वाहने धावतात सुसाट, अपघात वाढले, विद्यार्थी, वयोवृद्धांना जीव मुठीत धरून पार करावा लागतो महामार्ग‎

3 hours ago 1
नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा येथून रोज शेकडो वाहने वेगाने धावत असून यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी प्रवासी, विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे. खंडाळा येथून अनेक शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी बोरसर, भिंगी, वैजापूर, शिऊर, नालेगाव येथे जात असतात. त्यामुळे येथे नियमित वर्दळ बघावयास मिळते. आझादनगर, रमाईनगर, पानगव्हाण, भिंगी, ढगे वस्ती, मगर वस्ती या भागातील ४०० ते ५०० च्या आसपास विद्यार्थी शाळेत, महाविद्यालयात जातात. त्यांना हा महामार्ग ओलांडून जावे लागते. या वेळी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून हा महामार्ग पार करावा लागतो. या रस्त्यावर चालणारी वाहने भरधाव येत-जात असतात. परंतु या महामार्गावर गावानजीक गतिरोधक नसल्याने वाहनचालक ब्रेक मारण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात होणे ही बाब नित्याचीच झाली आहे. याकरिता राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या जिवाशी लावलेला खेळ थांबवावा व बस्थानकाजवळ गतिरोधक बसवावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे. दररोज वाहने जाईपर्यंत थांबावे लागते शालेय विद्यार्थी रोहित अरुण जाधव याने सांगितले की, मी रोज शाळेत जाताना रस्त्यावरून जाताना गाड्या जोरात असल्याने खूप वेळ रस्त्याच्या कडेला गाडी जाईपर्यंत उभे राहून रस्ता पार करून जावे लागत आहे. त्वरित गतिरोधक बसवावे ग्रामस्थ अहमद खान साबेर खान म्हणाले की, खंडाळ्यातील महामार्गावरील बस्थानकाजवळ एका बाजूला महाराष्ट्र ग्रामीण बँक तर दुसऱ्या बाजूला भारतीय स्टेट बँक असून आर्थिक व्यवहारासाठी नेहमीच वर्दळ असल्याने या महामार्गावर अधिक नागरिकांनी ये-जा असते. त्यामुळे अपघात अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. वाहनधारक बेफाम वाहने चालवतात त्यामुळे त्वरित गतिरोधक बसवावेत. खंडाळ्यात मुख्य चौकात झालेले अपघात, एकाने गमावला जीव, अनेक जखमी येवला आगारातील एमएच ०६ एस ८९०३ या क्रमांकाची बस नाशिककडून छत्रपती संभाजीनगर कडे ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान जात असताना खंडाळ्यात मुख्य चौकातून एमएच २० एझेड १४४२ वर दुचाकीवर शेख मुख्तार शेख रज्जाक हे रस्ता ओलांडत गावात जात असतांना बसने त्यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. २१ सप्टेंबर २०२४ रोजी एमएच २० इ व्ही १२८४ व एमएच-२० एफ एक्स ११४३ या दोन्ही दुचाकीचा अपघात होऊन एक व्यक्तीचे पुर्ण दात पडुन गंभीर जखमी झाला. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी एमएच १७ एएस ५८४९ या दुचाकीवरून येथील दादासाहेब सुखदेव मगर हे रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article