खामगावात पालिकेचे शौचालयच बनले "सेल्फीपॉइंट':महाराष्ट्रातील पहिला प्रेरणादायी प्रयोग यशस्वी ; स्वच्छता, पर्यावरण संबंधी संदेश

8 hours ago 1
शासनाकडून स्वच्छ भारत अभियान राबवत नागरिकांना शौचालय बांधण्याचे सातत्याने आवाहन केले जाते. त्यासाठी सरकार अनुदान देखील देत आहे. शिवाय वेगवेगळ्या उपयायोजना आणि जाहिरातींच्या माध्यमातून लोकांपर्यंत शौचालयाबाबत माहिती पोहोचवण्यात येत असते. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात नगर पालिकेच्या माध्यमाने तयार करण्यात आलेले शौचालय सध्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सार्वजनिक शौचालयाचे नाव जरी काढले तरी अनेकांच्या मनात किळसवाणी भावना निर्माण होते. दुर्गंधीमुळे या शौचालयांचा वापर करणे काय, त्याच्याजवळून जाण्याचीही इच्छा होत नाही, परंतु आता या सर्व बाबींना छेद देणारा प्रयोग बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात यशस्वी झाला आहे. शहरातील नवा फैल भागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत पालिकेच्या निधीतून सेल्फिपाईंट पालिका शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांनी पुढाकार घेतला होता. नाविन्यपूर्ण संकल्पनेतील सेल्फिपॉईंट शौचालयाने सार्वजनिक शौचालयाच्या बाबतीत करण्यात येणारी कल्पनाच बदलून टाकली आहे. या शौचालयाला दुर्गंधीमुक्त करण्यासाठी सुगंधित फुलांच्या वृक्षांचे रोपण, सॅनिटरी नॅपकीनचे निर्जंतुकीकरण करून विल्हेवाट लावण्याची सुविधा, पावसाचे पाणी शौचालयाच्या टाक्यांत साठवण्याची व्यवस्था, या शिवाय शौचालयाच्या भिंती पेंटिंगद्वारे बोलक्या करण्यात आल्या असून या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश, हागणदारी मुक्त, घंटा गाडीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे हा महाराष्ट्रातील पहिला यशस्वी प्रयोग असल्याचे सांगण्यात येत आहे. ^लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना व पालिकेच्या फंडातून ४५ लाखांमध्ये सेल्फी शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. हे राज्यातले पहिले सेल्फी शौचालय आहे.चित्रीकरण करून नागरिकांना संदेश देण्यात आला आहे. हे शौचालय उभारण्यासाठी सेवानिवृत्त मुख्याधिकारी आकोटकर व आमदार आकाश फंुडकर यांचे सहकार्य लाभले आहे. -प्रवीण कदम, माजी नगरसेवक

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article