Navneet Rana connected Daryapur Sabha Rada : अमरावतीच्या सभेत राडा झाला. माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर काल दर्यापूरच्या सभेत खुर्च्या भिरकावण्यात आल्या. आहेत. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे. नवनीत राणा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...
नवनीत राणाImage Credit source: ANI
एकाही हल्लेखोरांना सोडणार नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. मी शांत होते तरी देखील मला बघून काही लोकं आक्षेपार्ह घोषणाबाजी करत होते. मार देंगे काट, देंगे म्हणत होते. काही लोकांनी माझ्यावर थुकंन्याचा प्रयत्न केला. मारहाणीमध्ये माझ्या अंगरक्षकाला खुर्ची लागल्या. त्यांची भाषा कापण्याची असेल तर आमचीही तशीच राहील आम्ही शांत बसणार नाही. कोणी एका गालावर मारेल तर आम्ही दोन मारेल आता हिंदू शांत बसणार नाही. खल्लार गाव हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षच गाव आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.
अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सभेत राडा प्रकरणाला आता नवं वळण आहे. आरोपीवर नवनीत राणा यांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न तसेच अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झालेत. आतापर्यंत 4 हल्लेखोरांना अटक तर फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं आहे. काल रात्री नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत खुर्च्याची फेकाफेक करून तुफान राडा झाला होता.