खोटारडा म्हणत अमोल मिटकरीची रोहित पवारांवर टीका:जय-पार्थ पवार जर कर्जत-जामखेडमध्ये फिरले असते तर तुमचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता

2 hours ago 1
रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात जय, पार्थदादा पैकी कुणी एक जरी फिरला असता तरी याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता. रोहित पवारांनी बारामतीमध्ये अजित पवारांचे पाय पकडून माझ्या मतदारसंघात येऊ नका असे म्हटले, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र डागले आहे. दरम्यान अजित पवार आणि रोहित पवार यांची स्व.यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर भेट झाली. यावेळी अजित पवार रोहित पवारांना म्हणाले की, 'बेट्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...', यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की अजित पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्या सभेमुळे काहीतरी खालीवर झाले असते किंवा उलटही झाले असते. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले, असा टोला रोहित पवारांनी लगावला. यावरुन अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नेमके मिटकरींचे ट्विट काय? अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यावर हा किती खोटा बोलतोय.बारामतीमध्ये पाय धरून काका माझ्या मतदारसंघात येऊ नका ही विनंती करुन ,आज मस्तीत बोलतोय.जय,पार्थदादा पैकी कुणी एक जरी कर्जत जामखेड मध्ये फिरला असता तरी याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता. खोटारडा 'वाचलास... माझी सभा झाली असती तर....'- अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराडमधील प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी अजित पवार आणि आमदार रोहित पवार समोरासमोर आले. रोहित पवार यांनी चरणस्पर्श करत अजित पवार यांचे आशीर्वाद घेतले. या दरम्यान अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून म्हणाले की, 'बेट्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...' असे म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला. विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार सामना झाला होता. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. इतकेच नाही तर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यभरात 41 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ दहा जागा मिळाल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार यांनी सांगितलेला दावा त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. वाचा सविस्तर कर्जत-जामखेडमध्ये माझा पराभव नियोजित कट- राम शिंदे कर्जत-जामखेडमध्ये माझा पराभव नियोजित कट होता. यात माझा बळी गेला. अजित पवार यांनी रोहित पवार यांना तुझ्या मतदारसंघात सभेला आलो असतो तर काय झाले असते, हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर बोलताना भाजप नेते आमदार राम शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. राम शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, आमदार रोहित पवार जे स्वत:ला भावी मंत्री, भावी मुख्यमंत्री समजतात, त्यांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला नाही. एकूणच राजकीय सारीपाठामध्ये जे घडले त्यांचा मी बळी ठरलो आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article