Published on
:
21 Nov 2024, 3:26 pm
Updated on
:
21 Nov 2024, 3:26 pm
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तीन मतदारसंघांमध्ये बुधवारी (दि.२०) झालेल्या विधानसभा निवडणुकीत सरासरी ७५.२६ टक्के मतदान झाले. आरमोरी मतदारसंघात ७६.९७ टक्के, गडचिरोलीत ७४.९२ तर अहेरी मतदारसंघात ७३.८९ टक्के मतदान झाले. तिन्ही मतदारसंघात सरासरी ७५.२६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात एकूण ४ लाख १२ हजार १५१ पुरुष मतदार, तर ४ लाख ९ हजार २९४ महिला आणि १० तृतीयपंथी असे एकूण ८ लाख २१ हजार ४५५ मतदार होते. त्यापैकी ३ लाख १४ हजार ९३५ पुरुष, ३ लाख ३ हजार २९६ महिला व ५ तृतीयपंथी असे एकूण ६ लाख १८ हजार २३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आरमोरी मतदारसंघात १ लाख ३१ हजार ६० पुरुष मतदार, १ लाख ३१ हजार ७१० महिला आणि १ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ६२ हजार ७७१ मतदार होते. त्यापैकी १ लाख २ हजार ७२० पुरुष, ९९ हजार ५४६ महिला व १ तृतीयपंथी असे एकूण २ लाख २ हजार २६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ५४ हजार ६१० पुरुष मतदार, १ लाख ५२ हजार ६१० महिला व ३ तृतीयपंथी असे एकूण ३ लाख ७ हजार २२३ मतदार होते. यातील १ लाख १६ हजार ७०४ पुरुष मतदार, १ लाख १३ हजार ४६९ स्त्री मतदार तर १ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ३० हजार १७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अहेरी विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख २६ हजार ४८१ पुरुष मतदार, १ लाख २४ हजार ९७४ महिला व ६ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ५१ हजार ४६१ मतदार होते. यातील ९५ हजार ५११ पुरुष मतदार, ९० हजार २८१ महिला मतदार, तर ३ तृतीयपंथी असे एकूण १ लाख ८५ हजार ७९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.