सरवडे : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा जाहीर प्रचार करण्यासाठी आवश्यक ते मानधन घेऊनदेखील सूर्याजी पिसाळसारखे काम करणार्या विश्वासघातकी, गद्दार माजी आमदार के. पी. पाटील यांना निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांनी सरवडे येथे झालेल्या कोपरा सभेत बोलताना केले.
आमदार आबिटकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार के. पी. पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात होते. त्यांच्या माध्यमातून महायुती सरकारकडून प्रचंड प्रमाणात कामे करून स्वार्थ साधला. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याच्या आणाभाकाही घेतल्या. कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत, गारगोटीतील सभेत लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा घोषित करून गद्दारी करणार नाही असे जाहीर सभेत सांगितले होते. प्रत्यक्षात निवडणुकीत छुपी यंत्रणा राबवून संजय मंडलिक यांच्या विरोधात ताकदीने काम करून केसाने गळा कापला. प्रत्येक वेळी आपला स्वार्थ साधला.
युवक नेते शिवराज खोराटे अभिषेक ढेंगे, ‘बिद्री’चे माजी संचालक नंदकुमार सूर्यवंशी, शिवाजीराव चौगुले, दत्तात्रय धनगर, के. के. राजगिरे, अरुण साठे, राजू साठे, मानसिंग पाटील, कुंडलिक पाटील, डी. एस. बुजरे, सर्जेराव पाटील, आनंदा कोपर्डेकर, संभाजी आरडे, बाबुराव लाड, कपिल खोराटे, जगदीश चव्हाण, सचिन रामभाऊ काशीद, तुकाराम कुंभार, सचिन एकशिंगे, संदीप खोराटे, पांडुरंग खोत, दिगंबर साठे, सीताराम खाडे, जगन्नाथ चव्हाण, बाबुराव बसरवाडकर, योगेश पाटील उपस्थित होते. आभार राजेश मोरे यांनी मानले.
माजी आमदार के. पी. पाटील यांचं अख्खं आयुष्य विश्वासघात, लबाडी आणि गद्दारी करण्यात गेले. कोणतीही ठोस विकासकामे न करता लबाडी करून मते मागत आहेत. अशा लबाड लांडग्यास लोक कायमचे घरात बसवतील, असे नंदकिशोर सूर्यवंशी प्रचारात दरम्यान बोलताना आरोप केला.