विजेचा धक्का लागून वैभव भिडे याचा मृत्यू झाला. Pudhari Photo
Published on
:
18 Oct 2024, 9:17 am
Updated on
:
18 Oct 2024, 9:17 am
पणजी : पुढारी वृत्तसेवा: गोव्यात एका मंदिरात काम करत असताना विजेचा धक्का लागून सिंधुदुर्ग जिल्हातील झोळंबे-दोडामार्ग येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिचोली तालुक्यातील कुळण-सर्वण येथील श्री योगेश्वरी मंदिराच्या सभा मंडप परिसरात विजेचा धक्का लागून वैभव भिडे (वय २५) या झोळंबे-दोडामार्ग येथील युवकाचा मृत्यू झाला. सभा मंडपात दुरुस्तीचे काम करत असताना विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन वैभव खाली कोसळला. उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला त्वरित डिचोली आरोग्य केंद्रात नेले. उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.