घर सोडून गेलेला मुलगा संत बनून जन्मभूमीत परतला:पिंपळगाव निपाणी ग्रामस्थांना अंत्ययात्रेच्या वैकुंठ रथासाठी दिले साडेचार लाखांचे दान‎

2 days ago 1
तालुक्यातील पिंपळगाव निपाणी गावातून २९ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला तरुण संत होऊन आपल्या जन्मभूमीत दाखल झाला. मध्यप्रदेशात जाऊन विद्यावाचस्पती होऊन सद्गुरू उपाधी प्राप्त केलेले संत श्रीवेदांत सागर (गुरुजी) यांनी पिंपळगाव निपाणी येथील संदुआई देवस्थानला ४ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम मदत दिली. ही रक्कम पिंपळगाव निपाणी गावातील नागरिकांच्या अंत्यसंस्कारासाठी घेण्यात येणाऱ्या वैकुंठ रथासाठी वापरावी, असे संत श्रीवेदांत सागर यांनी सूचित केले. संत श्रीवेदांत सागर तथा गुरूजी हे मूळचे पिंपळगाव निपाणीचे रहिवासी आहेत. त्याचे मूळ नाव नामदेव दामू गोर्डे. तब्बल २९ वर्षांपूर्वी त्यांनी आपली जन्मभूमी सोडली. गाव सोडल्यावर ते कोठे गेले याविषयी गावकऱ्यांसह घरच्यांनाही अचूक माहिती नव्हती. या कालावधीत ते भागवत संप्रदायाकडे वळले. गाव सोडल्यानंतर त्यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण घेतले. त्यांनी एम. एसस्सी बी. एड. पूर्ण करून पीएच.डी ही पदवी प्राप्त केली. आपल्या अमोघ वाणीतून ते प्रवचन देतात. एक ख्यातनाम प्रवचनकार म्हणून संत श्रीवेदांत सागर गुरूजी मराठवाडा, विदर्भ व मध्यप्रदेशात ते सद्गुरू म्हणून प्रसिद्ध आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त पिंपळगाव निपाणी येथील संदुआई देवस्थानला व गावाला त्यांनी भेट द्यावी, अशी विनवणी संदुआई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रेय गोर्डे यांनी केली. ही मागणी संत वेदांत सागर यांनी मान्य केली. नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमातस आपल्या गावात २९ वर्षानंतर म्हणजे १० ऑक्टोबर २०२४ रोजी परतले. पिंपळगावचे दिवंगत हभप दामू गंगाधर गोर्डे व चंद्रकला दामू गोर्डे यांचे ते सुपुत्र. जन्मभूमीत आल्यावर संदुआई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डी. के. गोर्डे, बाळासाहेब वाकचौरे, केशवराव चौधरी, लालूशेठ दळवी, भीमा गोर्डे, डॉ. नानासाहेब गोर्डे, दादाभाऊ गोर्डे, पिराजी डगळे यांनी संत वेदांत सागर यांचा सन्मान केला. त्यांची सजवलेल्या रथातून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली. नवरात्रीच्या मुहूर्तावर संतश्री वेदांत सागर यांनी सुश्राव्य प्रवचन दिले. संटूआई प्रतिष्ठानचे कार्य पाहून त्यांनी प्रतिष्ठानला ४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वैकुंठ रथ सेवेसाठी रोख दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article