Published on
:
04 Dec 2024, 8:01 am
Updated on
:
04 Dec 2024, 8:01 am
आधी तांत्रिक कारणामुळे आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबलेल्या पशुगणनेला अखेर 25 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात सुरुवात झाली. यंदा होणारी पशुगणना 21 वी असून ती प्रथमच डिजीटल पद्धतीने मोबाईल अॅपच्या मदतीने होणार आहे. या पशूगणनेत जिल्ह्यातील गायी, म्हशी, कुत्री (पाळीव आणि भटके स्वतंत्रपणे), शेळ्या, मेंढ्या, गाढवे, उंट, घोडे आणि डुकरांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. यासह पहिल्यांदा भटक्या समाजाच्या पशुधनासह गोठ्यात असणार्या जनावरांची गणनेत नोंद घेण्यात येणार आहे.
राज्यात पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. देशातील लोकसंख्या ज्या पद्धतीने मोजली जाते, त्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते. या वर्षी सुरुवातीला 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत ही पशुगणना होणार होती. मात्र, पशूगणेच्या अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने त्या सोडवण्यासाठी बराच कलावधी लागला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पशूगणेचे काम सुरू होवू शकले नाही. मात्र, निवडणूका संपताच 25 नाव्हेंबरपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. यंदाचे पशूगणनेचे काम हे पूर्णपणे पेपरलेस राहणार असून यासाठी पहिल्यांदा स्मार्टफोनचा वापर केला जाणार आहे. 2019 मध्ये झालेल्या 20 व्या पशुगणनेसाठी प्रगणकांना टॅबलेट दिले होते, तर त्यापूर्वीची पशुगणना नोंदवहीत केली जात होती. नोंदवहीत अनेक रकाने होते. ते भरताना बराच वेळ जात असे. मात्र, यावर्षी होणार्या पशुगणनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच वेळेची बचत करण्यासाठी तसेच कामात अचूकता आणण्यासाठी यंदा अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच्या मदतीने सॉफ्टवेअरवर पशुधनाची माहिती भरली जात आहे.
यंदाची पशुगणना ही जनावरांच्या जात, वय आणि प्रजातीनिहाय करण्यात येणार आहे. यासाठी 583 प्रगणक आणि 78 पशुपर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे तालुकानिहाय प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ही पशुगणना नगर पालिका, परिषद आणि महानगर पालिका अशा शहरी भागासह ग्रामपंचायत हद्दीत म्हणजे ग्रामीण भागात स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. तीन महिने चालणार्या पशुगणनेसाठी सुपवाईजरांना ऑनलाईन युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आलेले आहेत. ते नेमण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना युजर आयडी देण्यात आलेले आहे.जिल्ह्यात आजपासून सुरू होणारी पशुजणगनाही प्रत्येक भागाच्या वायव्य दिशेपासून सुरू होणार असून त्यानंतर घडाळ्याच्या काट्यानूसार उर्वरित दिशेला पूर्ण करण्यात येणार आहे. पशुजनगणेच्या राष्ट्रीय मानाकंनानूसारही गणना होणार आहे. 2011 च्या माणसांच्या जनगणनेच्या कुटूंब संख्येच्या यादीनूसार ही पशुगणना करण्यात येणार आहे.
भटकी कुत्री, गटक्या गायी आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युननटी), गोशाळा, पांजार पोळातील गोवांशाची माहिती देखील या पशूगणनेत समोर येणार आहे. तसेच जनावरांची जात, लिंग आणि वयानूसार जनावरांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.
राज्यातील जिल्हानिहाय दुध, अंडे, मास, लोकरीच्या उत्पादनाचा अंदाज येणार आहे. विविध जातीच्या पशूधनाचा शोध घेवून पशूपैदास गायी आणि म्हशीची संख्या ठरवणे, पशू दवाखान्यांची संख्या ठरवणे, नमुने आणि आव्हाने ओखळण्यास मदत होणार असून विविध प्रदेश आणि समुदायांना पशूधनानूसार संख्येवर आधारीत पायाभूत सुविधा आणि सेवा देता येणार आहेत.