चांदवडला अतिवृष्टीमुळे 6891 शेतकऱ्यांचे 4189 हेक्टरचे नुकसान:तहसीलदारांकडून ‎नुकासीची पाहणी‎

2 days ago 3
चांदवड तालुक्यात रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने तीन तास जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील ३२ गावांमधील ६८९१ शेतकऱ्यांच्या ४१८९ हेक्टर क्षेत्रफळावरील शेतीपिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाने नदीनाल्यांना पूर आला. शेतांमधून पाणीच पाणी वाहत होते. नुकसानग्रस्त भागाची सोमवारी (दि. १४) आमदार डॉ. राहुल आहेर, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्यासमवेत पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. चार दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी सायंकाळी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. चांदवडसह वडाळीभोई, धोडांबे, वडनेरभैरव जिल्हा परिषद गटातील गावात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे विनता व नेत्रावती नद्यांना पूर आला. यामुळे धोडांबे-वडाळीभोई, खडक ओझरकडे जाणारा मार्ग काही काळ बंद होता. भयाळे शिवारातील विनता नदीवरील सिमेंट प्लग बंधारा पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. वडनेरभैरव, वडाळीभोई, धोडांबे, कुंडाणे, कानमंडाळे या भागांत कांदा व द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची डॉ. आहेर यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्यासमवेत पाहणी करत नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. नुकसानीचा प्राथमिक अंदाज पीक बाधित क्षेत्र (हे) शेतकरी द्राक्ष ५२४ ८५६ कांदा १३३४.३० २११० मका ३९२.५० ५६७ सोयाबीन ११२९ १९०२ कांदा रोपे ७.३० २६ भाजीपाला २७९.९० ४१२ टोमॅटो ५२२ १०१८

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article