छत्रपती शिवरायांच्या मंगळवेढ्यातील अश्वारूढ पुतळ्यास दोन वर्षांनंतर मुभा:जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळताच शिवप्रेमींनी वाटले पेढे‎

2 days ago 2
मंगळवेढा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा, ही शिवप्रेमींची कित्येक दिवसांची मागणी होती, यासाठी तरुणांनी एकत्र येऊनलोकसहभागातून ३१ लाख रुपये संकलित करून पुतळ्याची निर्मिती केली. पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरोत्थानमधून ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. परंतु पुतळ्याला परवानगी नसल्यामुळे सुशोभीकरणाचे काम रखडले होते. अखेर सोमवारीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळताच शिवप्रेमींनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. मोठी मिरवणूक काढून पुण्यातून मंगळवेढा येथे दोन वर्षांपूर्वी पुतळा आणून चबुतऱ्यावर स्थापन केला आहे. मात्र पुतळ्याच्या उभारणीला मंजुरी नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चबुतऱ्यावर झाकून ठेवला होता. परंतु आता मंजुरी मिळाल्याने सुशोभीकरणाचे काम सुरू झाले आहे. लवकर होऊन लोकार्पण करण्यात येईल. या वेळी अश्वारूढ पुतळा समितीचे अध्यक्ष अजित जगताप, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी, प्रवीण खवतोडे, प्रतीक किल्लेदार यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने शिवप्रेमी चौकात उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची १५ फूट असून, यासाठी चार टन ब्राँझ धातू वापरण्यात आले आहे. हा पुतळा लोकवर्गणीतून उभा करण्यात आला आहे. पुणे येथील मूर्तिकार महेंद्र थोपटे यांनी हा पुतळा बनवला आहे. लोकसभागातून शहरात छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर या चार महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी निधी गोळा करण्यात आला असून, हे सर्व पुतळे आचारसंहिता संपल्यानंतर बसवण्यात येणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. मंजुरीसाठी मदत करणारे सर्व पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांचे आभारी आहोत, यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या विभागाची मंजुरी घेऊन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. -अजित जगताप, अध्यक्ष, पुतळा समिती

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article