छावणीत टेक आणि इन्क्युबेशन लॅब स्थापन:संरक्षण क्षेत्रातील विषयावर करता येणार अभ्यास

4 days ago 3
छावणी परिसरातील आर्मी कॅम्पसमध्ये आर्मी, मॅजिक आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने टेक आणि इन्क्युबेशन लॅब (अन्वेषण) स्थापन करण्यात आली आहे. त्याचा विद्यार्थी, प्राध्यपकांना संरक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर अभ्यास, संशोधन करणे, समस्यांचे निराकरण करण्यासाठी फायदा होणार आहे. मॅजिकचे संचालक रितेश मिश्रा म्हणाले, २ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात निर्माण केलेल्या या लॅब मध्ये थ्री डी प्रिंटिंग, ओपन सर्व्हिसेससह एआय सर्व्हर, व्हर्चुअल रियालिटी सह ड्रोन तंत्रज्ञान, थ्री डी इमेगला २ डी करणारे आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग मशीन असे आधुनिक मशीन बसवण्यात आल्या आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना रक्षा क्षेत्रातील प्रॉब्लेम स्टेटमेंट देण्यात येणार आहे. अभ्यास व संशोधन करणे आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी या लॅबचा उपयोग होईल. संरक्षण क्षेत्रात नावीन्यतेला मोठी संधी नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. युद्ध करण्याच्या पद्धतीत अत्यंत वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे देशाची संरक्षण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी रक्षा क्षेत्रातील उत्पादनात सातत्याने संशोधन करणे, नावीन्यता आणणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. त्या दृष्टीने युद्ध तंत्रज्ञन आणि डिफेन्स क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी देशभरात टेक इन्क्युबेशन लॅब वाढवणे नितांत गरजेचे आहे. अशी माहिती मेजर जनरल अमर पाल सिंग चहल यांनी दिली. इंटरनॅशनल कन्व्हेन्शनसाठी हालचाली वाढल्या शेंद्रा ऑरिक सिटीत ५० एकरावर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर स्थापन करण्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सांमत यांनीवी केली होती. त्याच्या अंमलबजावणीसाठी आता हालचाली वाढल्या आहे. प्रकल्प सल्लागार एजन्सी (पीएमसी) नेमणूक करण्यासाठी शनिवारी निवेदन मागवले आहे. उद्योजक सरकारकडे अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. गतवर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या मसिआच्या महा एक्स्पो मध्ये उद्योग मंत्री उदय सांमत यांनी राष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर लवकरच स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. ऑरिक सिटीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकांनी यांनी कन्व्हेन्शन सेंटर कसे असायला हवे, याबाबत मॉडल सादरीकरण केले होते. उद्योजकांनी ते बघितल्यानंतर त्यातील त्रूटी बघून त्याला नामंजूर केले होते.त्यानंतर काकांनी यांची बदली झाली. त्यामुळे हा महत्त्वाचा विषय मागे पडला होता. निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर पाऊल राष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर लवकरात लवकर व्हावे, हि उद्योजकांनी आग्रही मागणी आहे. त्याची पूर्तता करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ऑरिक सिटी प्रशासनाने समिती स्थापन करण्यासाठी निवेदन मागवली आहेत. त्यामुळे उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर उद्योजक व त्यांच्यावर निर्भर असलेल्या मतदारांना खुश करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार असल्याचेही बोलले जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article