जन्मजात कलागुण ओळखून मुलांना प्रोत्साहन द्याव:छायाताई फिरोदिया यांचे प्रतिपादन, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना सायकल वाटप‎

2 days ago 2
जगात कला क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. मुलांमध्ये जन्मजात काही कलागुण असतात. ते ओळखून त्या दिशेने त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांची झपाट्याने प्रगती होते. कला क्षेत्रात लायन्स प्राईडने विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपिठ निर्माण केले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी केले. लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कलर्स ऑफ प्राईड या चित्रकला स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना सायकलचे तर इतर विजेत्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी अरविंद पारगावकर, लायन्स प्राईडचे अध्यक्ष अनिकेत आवारे, सचिव अक्षत झालानी, खजिनदार अक्षय तोडमल, लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर, सचिव डॉ. सिमरन वधवा, लिओ क्लबच्या अध्यक्षा रिधिमा गुंदेचा, हरजितसिंह वधवा आदींसह लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चित्रकला स्पर्धेत शहर व उपनगरातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला होता. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी कलर्स ऑफ प्राईड या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. पहिला गट एलकेजी ते पहिली दुसर गट दुसरी ते पाचवी तिसरा गट सहावी ते दहावी, त्यांना अनुक्रमे रेखाटलेल्या चित्रात रंग भरणे, नैसर्गिक देखावा किंवा सण-उत्सव, जागतिक शांतता किंवा सक्षम भारत हे विषय स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात आले होते. विशेष गटात झालेल्या स्पर्धेत स्नेहालय, बालभवन, मुकबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article