जन्मदाताच बनला नराधम:आई घरकामासाठी बाहेर जाताच बापाचा मुलीवर बलात्कार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

4 days ago 3
दारुड्या बापाने आपल्याच 14 वर्षीय मुलीवर जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर बलात्कार केला. पत्नी घरकामासाठी बाहेर जाताच बाप मुलाला खेळण्यासाठी बाहेर पाठवून मुलीवर बलात्कार करीत होता. या प्रकरणी नातेवाईकांनी हिंमत दिल्या नंतर मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरुन बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी हा पत्नी, मुलगी आणि मुलासह लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो गेल्या चार वर्षांपासून बेरोजगार असून त्याला दारुचे व्यसन आहे. नवरा कामावर जात नसल्यामुळे मुलीची आई घराबाहेर पडली. ती खासगी काम करुन संसाराचा गाडा हाकते. मुलगी 14 वर्षांची असून ती नवव्या वर्गात तर मुलगा पाचवीत आहे. दारुड्या वडिलांची गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीवर वाईट नजर होती. गेल्या तीन महिन्यांपासून तो तिला बाहुपाशात घेऊन अश्लील चाळे करीत होता. ‘तू आता मोठी झाली आहेस, म्हणून मी तुझा लाड करीत आहे.’ असे सांगून तो वारंवार तिच्याशी लगट करीत होता. मुलीने बापाच्या या घाणरेड्या कृत्याकडे दुर्लक्ष केले. मुलगी आंघोळ करुन बाहेर आल्यानंतर तिला कपडे त्याच्यासमोरच कपडे बदलण्याची सक्ती करीत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी नातेवाईकाकडे धार्मिक समारंभासाठी गेली असताना मध्यरात्रीनंतर झोपेत असलेल्या मुलीशी बापाने अश्लील कृत्य केले. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने नकार दिला. त्यामुळे तिला बापाने मारहाण केली. त्यानंतर बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नातेवाईकांनी दिली हिम्मत गेल्या आठवड्यात आई कामावरुन लवकर घरी आल्यानंतर मुलीने पोटात दुखत असल्याचे सांगून रडायला लागली. आईने तिची आस्थेने विचारपूस केल्यानंतर वडिलांनी नुकतेच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने पतीला विचारणा केली. त्याने कबुली दिली आणि पोलिसांत गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने काही नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी हिम्मत दिल्यामुळे ती मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात गेली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article