प्रातिनिधिक छायाचित्र.file photo
Published on
:
04 Dec 2024, 8:22 am
Updated on
:
04 Dec 2024, 8:22 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात आज (दि.४) पहाटे दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर दोन ग्रेनेड फेकले. एका ग्रेनेडचा स्फोट झाला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे वृत्त PTIने दिले आहे.
सुरनकोट भागात लष्कराच्या छावणीच्या मागे असलेल्या लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांनी दोन ग्रेनेड (हातबॉम्ब) फेकले. त्यापैकी एकाचा स्फोट झाला, तर दुसरा स्फोट झाला नाही. शोध मोहिमेदरम्यान एक ग्रेनेड निकामी करण्यात आला. तर स्फोट झालेल्या ग्रेनेडचा सेफ्टी पिन लष्कराच्या छावणीच्या भिंतीजवळ सापडला. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.