जयसिंगपूर : सुनील निकम या चोरट्यास मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली.Pudhari File Photo
Published on
:
23 Sep 2024, 11:58 pm
Updated on
:
23 Sep 2024, 11:58 pm
जयसिंगपूर : कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात घरफोडी करणार्या अट्टल गुन्हेगार सुनील महादेव निकम (वय 28, रा. कुन्नूर पैकी गजबरवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव, सध्या रा. हरोली, ता. शिरोळ) यास शिरोळ पोलिसांनी अटक केली. त्याने परिसरात पाच घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 9 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जयसिंगपूर उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांनी दिली.
शिरोळचे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सराईत गुन्हेगार यांचेवर पाळत ठेवत असताना पोलिस अंमलदार युवराज खरात यांना हरोली येथे घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार राहण्यास असल्याची माहिती मिळाली. दि. 18 रोजी हवालदार बाबाचाँद पटेल, पो. कॉ. युवराज खरात, संजय राठोड, नितीन साबळे यांनी अटक केली.