Published on
:
21 Nov 2024, 10:18 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:18 am
जळगाव : शहरातील इच्छादेवी चौकात खासगी वाहनात घरगुती गॅस रिफिलींग करत असतांना सिलेंडरचा स्फोट झाला होता. या घटनेत जखमी झालेल्या २३ वर्षीय तरूणीचा पुणे येथील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. एकाच परिवारातील ५ जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. रश्मी संजय तेरवडीया (दालवाला) (वय २३, रा. गणेशपेठ पुणे) असे मयत तरुणीचे नाव आहे.
याबबात अधिक माहिती अशी की, दिवाळीनिमित्त पत्नीसह मुलीला घेवून ते जळगावात राहणारे त्यांचे साडू भरत दालवाले यांच्याकडे आले हाते. याठिकाणी आल्यानंतर ते अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी त्यांनी संदीप शेजवळ यांचे वाहन भाड्याने घेतले होते. वाहन चालकाने ईच्छादेवी चौकी पोलीस चौकशीशेजारील रिफीलींग सेंटवर वाहनात गॅस रिफिलींग करीत असतांना गॅस सिलींडरचा स्फोट होवून तेरवडीया यांच्या कुटुंबातील तिघे, दालवाले कुटुंबातील चौघांसह गॅस भरणारा, वाहन चालक व पोलीस कर्मचारी असे एकुण ११ जण यातील यापुर्वी ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर जखमी रश्मी संजय तेरवडीया यांना पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. पित्यानंतर आता मुलीचाही मृत्यू झाल्याने परिवारावर शोककळा पसरली आहे.