नवी दिल्ली/मुंबई (Election EVM Machine) : महाराष्ट्र आणि झारखंड (Assembly Elections 2024) विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण झाले. बुधवारी, महाराष्ट्र आणि झारखंडच्या मतदारांनी ईव्हीएम मशीनमधील बटण दाबले आणि त्यांच्या राज्यातील पुढील सरकारबाबतचा निर्णय ईव्हीएम नावाच्या बॉक्समध्ये बंद झाला. आता 23 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर विजय-पराजय ठरणार असून, पुढील पाच वर्षांसाठी कोणत्या पक्षाची किंवा आघाडीची सत्ता राहणार हे ठरणार आहे.
मतदान केल्यानंतर आपण सर्वजण निवडणुकीच्या निकालाची वाट पाहत असतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे की, EVM चे बटण दाबून तुम्ही तुमचा निर्णय त्या मशिनमध्ये नोंदवता, त्यानंतर निवडणूक निकाल येईपर्यंत EVM कुठे आहे? तो सुरक्षित ठेवला आणि त्याचा डेटा किती काळ सुरक्षित राहतो?
जाणून घेऊया मतदान आणि मतमोजणी दरम्यानचा (EVM Machine) ईव्हीएमचा संपूर्ण प्रवास…
मतदान झाल्यावर लगेच काय होते?
मतदान केंद्रांवर मतदान पूर्ण झाल्यानंतर, पीठासीन अधिकारी मतांची नोंद काळजीपूर्वक तपासतात आणि प्रमाणित प्रत उमेदवारांच्या पोलिंग एजंटला देतात. यानंतर, उमेदवारांच्या पोलिंग एजंट्ससमोर ईव्हीएम मशीन सील केले जाते आणि ते सर्व सीलबंद कागदावर स्वाक्षरी करतात.
ईव्हीएम मशीन कुठे आणि कशी सुरक्षित?
मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन (EVM Machine) सील केल्यानंतर, कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये ही ईव्हीएम मशीन सुरक्षित आणली जातात. सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी स्ट्राँग रूममध्ये येईपर्यंत एकत्र राहतात. यानंतर उमेदवारांच्या संमतीने स्ट्राँग रूमचे गेट सील केले जाते.
स्ट्राँग रूम किती सुरक्षित?
निवडणूक आयोग तीन पातळ्यांवर त्याचे संरक्षण करतो. अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय निमलष्करी दलांच्या खांद्यावर आहे. स्ट्राँग रूमच्या आत सुरक्षेसाठी केंद्रीय दल तैनात आहे आणि बाहेर राज्य पोलिस दल तैनात आहेत. स्ट्राँग रुममध्ये प्रवेश करण्यासाठी एकच पॉइंट असून, स्ट्राँग रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, लॉग बुकमध्ये वेळ टाकूनच अधिकारी आतमध्ये प्रवेश करू शकतात. ही (EVM Machine) स्ट्राँग रूम मतमोजणीच्या दिवशीच उघडली जाते.
मतमोजणी सभागृहात ईव्हीएम मशीन कसे पोहोचते?
मतमोजणीच्या दिवशी ही यंत्रे कडेकोट बंदोबस्तात स्ट्राँग रूमपासून (Assembly Elections 2024) मतमोजणी हॉलपर्यंत नेली जातात आणि अंतर जास्त असल्यास बॅरिकेडिंग लावून (EVM Machine) ईव्हीएम मतमोजणी हॉलमध्ये नेले जाते. मतमोजणी सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिथे कर्तव्यावर असलेले अधिकारी सील काढून ईव्हीएममधील मतांची मोजणी करतात.