Published on
:
24 Nov 2024, 7:06 am
Updated on
:
24 Nov 2024, 7:06 am
पुढारी ऑनलाईमन डेस्क: Elon musk भारतात झारखंड आणि महराष्ट्र विधानसभेसाठीची मतमोजणी शनिवार (दि.२४) पार पडली. यासाठीचे झारखंडमध्ये २ टप्प्यात, तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुक मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. दरम्यान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी महाराष्ट्र, झारखंड मतमोजणीची दखल घेतली. या संदर्भात त्यांनी 'X' एक्स पोस्ट केली आहे.
१९ दिवसांनंतरही कॅलिफोर्नियामधील निवडणूक निकाल प्रलंबित
Tesla (टेस्ला) आणि SpaceX (स्पेसएक्स) चे सीईओ एलन मस्क यांनी भारतातील मतमोजणीवर एक्स पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "भारताने 1 दिवसात ६४ कोटी (६४० दशलक्ष) मतांची मोजणी केली, कॅलिफोर्नियाची निवडणुक होऊन १९ दिवस झाले तरी निकाल अद्याप प्रलंबित असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे".
राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाची अधिकृत घोषणा बाकी...
मतदानाच्या १९ दिवसांनंतरही कॅलिफोर्नियाने अधिकृतपणे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर केले नाहीत. त्यामुळे अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी या प्रक्रियेवर जोरदार टीका केली. तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान भारताने यशस्वीरित्या पार पाडलेल्या प्रचंड मतदान प्रक्रियेची तुलना केली. मस्क यांनी निदर्शनास आणून दिले की, भारताने केवळ एका दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी केली, तर यूएस राज्यात अजूनही मतमोजणी सुरू आहे.
१ दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी
भारतातील मतमोजणीबद्दलची पोस्ट रिट्विट करताना, मस्कने लिहिले, "भारताने 1 दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी केली. कॅलिफोर्निया अजूनही मतांची मोजणी करत आहे," या मतांची संख्या जवळपास २ लाखांपर्यंत असल्याचेही मस्क यांनी इमोजीच्या माध्यमातून या पोस्टमध्ये सांगितले आहे.
अद्याप अमेरिकेतील निवडणुका मतमोजणी अपूर्ण
अमेरिकेत ५ नोव्हेंबर ला निवडणुका झाल्या. निवडणुक होऊन १८ दिवस झाले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये अजूनही २ लाखांहून अधिक मतांची मोजणी सुरू आहे. अमेरिकेच्या निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी घोषित झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाला ३१२ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. बहुमतासाठी केवळ २७० इलेक्टोरल मतांची गरज होती. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना २६६ इलेक्टोरल मते मिळाली. जो बायडन सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. २० जानेवारीला कॅपिटल हिलवर डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणूंन शपथविधी होणार आहे.