कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांचा 66 हजार 434 मताधिक्याने दणदणीत विजय झालाPudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 6:55 am
Updated on
:
24 Nov 2024, 6:55 am
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांचा 66 हजार 434 मताधिक्याने दणदणीत विजय झाला. यावर नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी प्रतिक्रिया देताना जनतेने आशीर्वाद दिला म्हणून आपण निवडून आलो. त्याबद्दल आपण जनतेचे ह्रदयपूर्वक आभार मानतो, अशा त्यांनी भावना व्यक्त केल्या.
कल्याण ग्रामीण मतदार संघातील जनतेने मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून 31 व्या फेरीपर्यंत आघाडीवर ठेवले. आपल्यावर विश्वास ठेऊन आशीर्वाद दिला. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला दिलेली उमेदवारी आणि राज्यातील जनतेसाठी राबविलेल्या लाडकी बहिण सारख्या छोट्या-मोठ्या योजना जनतेच्या उपयोगी ठरल्या आहेत. या योजनांवर विश्वास ठेवत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या मतदार संघात केलेल्या विकासकामांवर विश्वास ठेऊन या जनतेने प्रचंड मोठा आशीर्वाद आपल्याला दिला आहे. सर्व मतदारांसह कार्यकर्ते शिवसैनिकांचे आपण आभार मानतो, अशा शब्दांत कल्याण ग्रामीणचे नव निर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कल्याण ग्रामीण मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या राजेश मोरे यांना या मतदार संघातील जनतेने कौल दिला. त्यामुळेच त्यांना इतके मताधिक्य मिळाल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. विजयाची माहिती मिळताच विजयी मिरवणूक काढत आमदार राजेश मोरे यांचे त्यांनी अभिनंदन केले. के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयापासून काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर जागोजागी गुलाल आणि बुलडोझरमधून फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी राजेश मोरे यांना शुभेच्छा दिल्या.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांचा 66 हजार 434 मताधिक्याने दणदणीत विजय झालाPudhari News network
घासून-पुसून नव्हे ठासून जिंकून आला - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
यावेळी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा कल्याण ग्रामीणच्या जनतेचा विजय असल्याचे सांगितले. आम्ही मागील 10 वर्षे या भागात केलेल्या कामाचा विजय आहे. मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षे केलेल्या कामाचा हा विजय आहे. एक कार्यकर्ता एक घासून पुसून नव्हे तर ठासून जिंकून आला आहे. महायुतीने मागील अडीच वर्षांत केलेल्या कामामुळे मोठे यश महाराष्ट्रात मिळाले आहे. जनतेने एकतर्फी विजय महायुतीला दिला आहे. अशा शब्दांत खा. डॉ. शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.