मुंबईसह कोकणात 75 विधानसभेच्या जागा आहेत. यापैकी जवळपास 27 जागा भाजपने जिंकत कोकणात नंबर वन स्थान मिळवले आहेPudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 7:05 am
Updated on
:
24 Nov 2024, 7:05 am
ठाणे : मुंबईसह कोकणात 75 विधानसभेच्या जागा आहेत. यापैकी जवळपास 27 जागा भाजपने जिंकत कोकणात नंबर वन स्थान मिळवले आहे. त्या खालोखाल शिंदे शिवसेनेने 22 जागा जिंकल्या आहेत. ठाकरे शिवसेनेने 11 जागा तर काँग्रेसने 3 जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पार्टी 2, मकाप 1, अजित पवार राष्ट्रवादी 2 अशा जागा जिंकल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीने 3 जागा जिंकल्या यामध्ये शिंदे शिवसेना 2 आणि भाजप 1 रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना 3 तर ठाकरेंची शिवसेना 1 आणि अजित पवार राष्ट्रवादी 1. रायगड जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना 3, भाजप 3, तर अजित पवार राष्ट्रवादी 1, तर ठाणे जिल्ह्यात भाजप 9, शिंदेंची शिवसेना 6, अजित पवार राष्ट्रवादी 1, शरद पवार राष्ट्रवादी 1, सपा 1 अशा जागा आल्या आहेत. तर पालघरमध्ये भाजप 3, शिंदेंची शिवसेना 2, मकपा 1 अशा जागा जिंकल्या आहेत. तर मुंबईत भाजपने 13 जागा जिंकल्या आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेने 6 जागा जिंकल्या आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेने 11 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे मुंबईत भाजप नंबर वन ठरला असला तरी ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंची शिवसेनेपेक्षा पाच जागा जादा जिंकल्या आहेत. ठाकरेंनी शिवसेना 20, तर शिंदेंच्या शिवसेनेने 57 जागा जिंकल्याने खरी शिवसेना शिंदेंची ठरली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत. कोकणात पुन्हा एकदा महायुतीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.
ठाण्यात भाजपच्या संजय केळकर यांनी 57 हजारांच्या मताधिक्क्याने विजय मिळवला. संजय केळकर यांना 1 लाख 19 हजार 353 तर त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेनेचे राजन विचारे यांना 61 हजार तर मनसेच्या अविनाश जाधव यांना 42 हजार मते मिळाली. कोपरीत एकनाथ शिंदे यांना 1 लाख 59 हजार 60 तर ठाकरे शिवसेनेच्या केदार दिघे यांना 38 हजार मते मिळाली.
ओवळा-माजीवडात शिंदे शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना 1 लाख 70 हजार तर त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेनेचे नरेश मणेरा यांना 69 हजार 963 मते मिळाली. मनसेच्या संदीप पाचंगे यांना या मतदारसंघात 11 हजार 991 मते मिळाली. कळवा-मुंब्रात शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना 1 लाख 57 हजार 141 तर त्यांचे प्रतिस्पर्धी अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना 60 हजार 913 , तर मनेसेचे सुशांत सूर्यराव यांना 13 हजार तर एमआयएमचे सर्फराज खान यांना 13 हजार 519 मते मिळाली आहेत. मीरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांनी गीता जैन आणि मुझफ्फर हुसेन यांच्यावर मात करत मोठा विजय मिळवला. महायुतीच्या मेहता यांना 1 लाख 27 हजार 180 तर काँग्रेसच्या मुझफ्फर हुसेन यांना 74 हजार 942 तर मागच्या वेळी निवडून आलेल्या अपक्ष गीता जैन यांना केवळ 20 हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचा निवडणुकीत पुरता पराभव झाला आहे.
ऐरोलीमध्ये भाजपचे गणेश नाईक 70 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना 26 व्या राउंडअखेर 1 लाख 13 हजार तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदे शिवसेनेचे बंडखोर विजय चौगुले यांना 44 हजार 102 तर महाविकास आघाडीचे एम. केे. मढवी यांनी 31 हजार मते मिळाली आहेत.
बेलापूर विधानसभा मतदारसंघात विजयासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 27 व्या राउंड अखेर महायुतीच्या मंदा म्हात्रे या 146 मताधिक्याने पुढे होत्या, तर महाविकास आघाडीचे संदीप नाईक हे मागे होते. नाईक यांना 89 हजार 183 तर भाजपच्या मंदा म्हात्रे यांना 89 हजार 329 मते मिळाली होती. तर शिंदे शिवसेनेचे बंडखोर विजय नहाटा यांना 18 हजार 400 मते मिळाली होती. कल्याण-डोंबिवलीच्या चार विधानसभा जागांपैकी चारही जागा महायुतीने जिंकल्या आहेत. कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी 26 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांना एकूण 81 हजार 516 मते मिळाली. गायकवाड यांना गोळीबार केलेले महेश गायकवाड यांनी शिंदे गटातून बंडखोरी केली होती. त्यांनी 55 हजार मते घेत दुसर्या क्रमांकावर राहण्याचा मान मिळवला. तर महाविकास आघाडीचे धनंजय बोडारे यांना 39 हजार मते मिळाल्याने ते तिसर्या क्रमांकावर फेकले गेले.
डोंबिवलीचा गड रवींद्र चव्हाण यांनी राखला असून त्यांना 77 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यांनी एकूण 1 लाख 23 हजार मते घेतली आहेत. ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीही आहेत. त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी 46 हजार मते मिळवली आहेत. तर वंचितच्या सोनिया इंगवले यांनी 1 ,500 मते घेतली आहेत.
कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघात महायुतीने मनसेचा पराभव करत महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी 66 हजारांचे मताधिक्य घेउन विजय संपादन केला. विद्यमान आमदार राजू पाटील यांना 74, 249 तर महाविकास आघाडीचे
महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये 18 पैकी तब्बल 16 जागा जिंकत मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात महायुतीने विजयाचे वादळ आणले आहे. तर महाविकास आघाडीने दोन जागा जिंकल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीमध्ये तब्बल 1 लाख 20 हजारांचे मताधिक्य घेऊ न केदार दिघेंचा पराभव केला. तर कळवा मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीच्या नजीब मुल्ला यांचा 96 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला.