Published on
:
03 Feb 2025, 8:58 am
Updated on
:
03 Feb 2025, 8:58 am
जळगाव : स्टॉक मार्केटशी संबधित अॅप्लीकेशन डाउनलोड करा आणि भरपूर नफा कमवा, असे आमिष दाखवित एका महिलेने व्यावसायीकाला सात लाख 30 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला.
38 वर्षीय व्यावसायिक हे शहारात मार्केटींग करतात. 2 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी पर्यंत त्यांच्या मोबाइल व्हाट्सअॅपवर एस.एम.आर्या आनंद असे नाव सांगणार्या महिलेने संपर्क साधला. तिने काही व्हॉट्पअॅप मॅसेज देखील पाठविले. त्यानंतर व्हिडीओ कॉल करत संवाद साधला.
एका लिंकव्दारे स्टॉक मार्केटशी संबधीत अॅप्लीकेशन डाउनलोड करायला लावले. त्यावरुन वेळोवेळी व्यावसायीकाच्या बँक खात्यामधून एकूण सात लाख 30 हजार रुपये ऑनलाइन पैसे खात्यावर ट्रान्स्फर करुन घेतले. त्याबदल्यात मात्र व्यावसायिकाला ना नफा दिला ना मुद्दल रक्कम परत केली. महिलेने त्यानंतर व्यावसायिकाशी संपर्क करणे बंद केले. व्यावसायिकाचे फोन देखील रिसीव्ह केले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार शनिवार (दि.1) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीष गोराडे हे पुढील तपास करीत आहेत.