जहाल माओवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण:शासनाने जाहीर केले होते दहा लाख रूपयांचे बक्षिस

4 days ago 4
शासनाने जाहीर दहा लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केलेल्या जहाल माओवादी दाम्पत्याचे गडचिरोली पोलिस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादर बसला आहे. वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु, दलम कमांडर (भामरागड दलम वय २७) व त्याची पत्नी रोशनी विज्या वाचामी, दलम सदस्य (भामरागड दलम वय २४) ही आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहे. शासनाने २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पीत माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६७४ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु २०१५ मध्ये कोंटा एरीया मध्ये भरती झाला. २०१५ ते २०२० पर्यंत डीकेएसझेडसी गिरीधर तुमरेटी याचा अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. २०२० ते २०२२ पर्यंत भामरागड दलममध्ये बदली होवून उपकमांडर पदावर कार्यरत. त्या नंतर २०२२ पासून आजपावेतो भामरागड दलममध्ये दलम कमांडर पदावर कार्यरत. त्याच्यावर आजपर्यंत एकुण १५ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १० चकमक व ५ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. रोशनी विज्या वाचामी २०१५ मध्ये राही दलममध्ये भरती झाली. २०१६ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन २०१७ पर्यंत कार्यरत. २०१७ मध्ये अहेरी दलममध्ये बदली झाली. २०१९ मध्ये भामरागड दलममध्ये बदली तर २०२१ मध्ये गट्टा दलममध्ये बदली २०२२ मध्ये परत भामरागड दलममध्ये बदली होवून आजपावेतो पार्टी मेंबर म्हणून कार्यरत होती. तिच्यावर आजपर्यंत एकुण २३ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १३ चकमक इतर १० गुन्ह्यांचा समावेश आहे. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु याला एकुण ५.५ लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. तर रोशनी विज्या वाचामी हिला एकुण ४.५ लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. या शिवाय पती पत्नी असलेल्या माओवादी सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून १.५ लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. असे एकुण ११.५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article