जाहीरनाम्यात नागरिकांनाही मुद्दे देता येणार:भाजपाकडे आल्या 50 हजार सूचना, खासदार महाडिक यांची माहिती

3 days ago 3
भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनाम्यासाठी 31 वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम सुरू केले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात नागरिकांनाही त्यांचे मुद्दे समाविष्ट करता येणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत पक्षाकडे तब्बल 50 हजार सूचना आल्याचे ते म्हणाले. धनंजय महाडिक म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहीरनाम्यात जनतेच्या अपेक्षा आणि सूचनांचाही विचार होणार असून जनतेने आपल्या सूचना, अपेक्षा आणि मते पक्षापर्यंत पोहचवावी,असे आवाहन करण्यात आले आहे. भाजपने महायुती सरकारच्या माध्यमातून नारीशक्तीच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, 3 गॅस सिलेंडर मोफत यासह अनेक योजना यशस्वी केल्या. युवा विकासासाठी कौशल्य विकास, युवतींना मोफत उच्च शिक्षण अशा योजना आणल्या. गरीब कल्याणासाठी मोफत शिक्षण, व्यवसायासाठी अनुदान, आनंदाचा शिधा योजना योजना यशस्वी केली. शेतकऱ्यांसाठीही अनेक योजना आणल्या. उद्योग वाढावेत, परकीय गुंतवणूक राज्यात यावी, यासाठी प्रयत्न होत आहे. महामार्ग, पुलाची उभारणी, मेट्रोचे जाळे, विमानतळांचा विकास, धरणांच्या कामाची पूर्तता, याबाबत काम सुरू आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, शेतकऱ्यांसाठी कृषी सौर योजना, दुधाळ जनावरांसाठी अनुदान आणि लसीकरण, मुक्त गोठा योजनेला प्रोत्साहन, खतांवरील सबसिडी, मत्स्यबीज उपलब्धता, मत्स्य शेतीला प्रोत्साहन अशा अनेक मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक काम करत आहे, असेही महाडिक यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article