जिल्ह्यातील तब्बल 2 लाख विद्यार्थी सहभागी होतील हात धुवा उपक्रमात:नरखेडला अंगणवाडीतील कार्यक्रमात साईओ कुलदीप जंगम यांची माहिती

2 days ago 2
नरखेड जागतिक हात धुवा दिनानिमित्त कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांना समन्वय साधून काम करावे. यामध्ये ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग यांनी कार्यक्रमाचे यशस्‍वी नियोजन करावे. किमान सर्व शाळांमधून दोन लाख विद्यार्थांचा सहभाग घेण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, युवक-युवती, महिला मंडळ, शालेय विद्यार्थी तसेच गावकऱ्यांनी जागतिक हात धुवा दिवसानिमित्‍त होणाऱ्या कार्यक्रमात मोठया संख्‍येने उपस्थित राहून हा दिवस साजरा करावा, असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे. नरखेड येथील अंगणवाडीमध्ये मंगळवारी (दि. १५) जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात आला आहे. ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रांमध्ये उपक्रम राबवणार मोहोळचे प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी म्हणाले, जागतिक स्‍वच्‍छता दिनाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा यासंदर्भात लोकशिक्षण घडून आणण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने (दि. १५) रोजी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्र, शाळा, महाविद्यालय व अंगणवाडयामधून जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार आहे. यानिमित्त शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांना हात धुण्याच्या पद्धती, हात धुण्याचे फायदे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्‍यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्‍ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अंगणवाडीत गर्भवती मातांना किटचे वाटप करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article