जिहाद शब्द देवेंद्र फडणवीसांनी काढला:पुण्यात विशिष्ट समाज भाजपला मतदान करतो त्याना व्होट जिहाद म्हणत नाही- शरद पवार
2 hours ago
1
जिहाद हा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला. काही मतदारसंघात मायनॉरिटीने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज आहे, हिंदू समाज आहे. त्यांनी भाजपला मतदान केले तर आम्हाला सवय आहे. असेच होते. पण याचा अर्थ जिहाद होतो असे नाही, असे म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागले आहे. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिहाद शब्द वापरत निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना निवडणुकीत यश येणार नाही हे लक्षात घेत त्यांनी हिंदू-मुस्लिम विषय घेऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कोणतेच पंतप्रधान असे बोलले नाही शरद पवार म्हणाले की, मी कॉलेजला असल्यापासून अनेक पंतप्रधानांची भाषणे ऐकली आहेत. यात विकासाच्या मु्द्यावर उद्याचा देश कसा असावा यावर ते भाष्य करत होते. पण नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत जे विकासाचा नाही तर 400 पारचा नारा देत आहे. हा 400 पारचा नारा कशासाठी असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. सरकार चालवण्यासाठी जर 272 खासदार लागातात तर 400 पारचा पारा कशासाठी हे जनतेच्या लक्षात आल्याने जनतेने त्यांना रोखले. राज्यातील महिला होताय बेपत्ता शरद पवार म्हणाले की, राज्यातील बेपत्ता महिला अन् मुलींचा आकडा पाहिला तर तो खूप मोठा असल्याचे दिसून येते. एका बाजूने लाडकी बहिण म्हणायचे अन् दुसरीकडे त्यांच्यावर अत्याचा होत आहे, त्या बेपत्ता होताय याचा पत्ता लागत नाही. आम्ही लोकांच्या समोर ही दुसरी बाजू मांडत आहोत. शेतकरी नाराज शरद पवार म्हणाले की, सोयाबीन, कापूस उत्पादन शेतकरी अस्वस्थ आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना हे सरकार काहीच करत नाही, यामुळे शेतकरी नाराज झाला आहे. वाचा सविस्तर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)