चांदी उजळली; पण सोनं गमावलं! ; ‘त्या’ दोघांकडून महिलेला अडीच तोळ्यांना गंडा

2 hours ago 1

महिलेला अडीच तोळ्यांना गंडा Pudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

16 Nov 2024, 7:55 am

Updated on

16 Nov 2024, 7:55 am

आम्ही कंपनीकडून आलो आहोत व दागिने उजळून देण्याचे काम करत आहोत, असे म्हणत अडीच तोळे दागिन्यांची लुट करत चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगावच्या शिदायकवाडी परीसरात काल शुक्रवारी सकाळी घडली.

प्रतिमा प्रताप आहेर ह्या शिदायकवाडी परीसरात कुटुंबासोबत राहतात. काल शुक्रवारी सकाळी त्या घरी एकट्याच असताना दोन इसम तेथे आले. आम्ही एका कंपनीकडून आलो आहोत व दागिने उजळून देतो असे प्रतिमा यांना सांगितले. त्यानंतर प्रतिमा यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेऊन पायातील चांदीच्या पट्ट्या त्यांच्याकडे दिल्या. त्या दोघांनीही काही क्षणात त्या चकाचक करुन दिल्या. त्यानंतर तुमच्या गळ्यातील व कानातील दागिने द्या, ते पण लगेच उजळून देतो, असे या दोघांनी सांगितले. त्यावर प्रतिमा यांनीही गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील वेल काढून या दोघांच्या ताब्यात दिले. पण ही दागिणे सोन्याची असल्याने ती उजळविण्यासाठी थोडी हळद लागेल, त्यामुळे घरातून हळद आणा, असे दोघांनी सांगितले.त्यावर प्रतिमा ह्या घरात हळद आणालया गेल्या. काही मिनीटातच त्या हळद घेवून घराच्या दरवाज्यावर आल्याही मात्र तोपर्यंत त्या दोघांनी अडीच तोळ्यांचे दागिणे घेवून केव्हाच पोबारा केल्याचे समोर आले.

दरम्यान, या महाठंगांना दुचाकीवरून जाताना अनेकांनी पाहिले. मात्र त्यांना कोणतीही शंका न आल्याने त्याकडे गांभीर्याने कोणी पाहिले नाही. दिड तोळ्यांचे मंगळसूत्र व एक तोळ्यांचे कानातील वेल चोरी झाले असल्याचे प्रतिमा आहेर यांनी सांगितले.

अनोखळी व्यक्तीपासून सावध रहा!

दरम्यान दिवसेंदिवस चोर्‍यांचे सत्र वाढत असून चोरटे वेगवेगळी शक्कल लढवून चोरी करतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी कुणीही काहीही व्यवहार करु नये.अथवा आपल्या परीसरात अनोळखी व्यक्ती आल्यानंतर त्याची सखोल चौकशी करून इतरांनाही त्याबाबत कळवले पाहीजे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article