निवडणूक कर्मचारीPudhari File Photo
Published on
:
16 Nov 2024, 10:33 am
Updated on
:
16 Nov 2024, 10:33 am
पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा क्षेत्रात 131 बोईसर विधानसभा मतदारसंघात 404 मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याकरता मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी शिपाई कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कर्मचार्यांसाठी दिनांक 11 व 12 नोव्हेंबर रोजी द्वितीय परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी 168 कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. या कर्मचार्यांविरोधात मतदान कर्मचारी कामासाठी हजर होण्याची नोटीस बजावली आहे. त्यांच्यासाठी पुन्हा निवडणूक कामकाजाबाबत टीम हॉल येथे टाकी नाका नवापूर रोड बोईसर शनिवार, दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षण कालावधीत जर निवडणूक कर्तव्यावर हजर होण्यासाठी कर्मचारी हजर झाले नाहीत व कर्तव्यात कसूर केली तर जिल्हा निवडणूक अधिकारी पालघर यांनी संबंधित कर्मचारी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कर्तव्यावर येत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील माळी बोईसर विधानसभा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे. त्यांनी कर्मचार्यांना हजर होण्याची एक संधी दिली आहे. आता यापैकी किती कर्मचारी येतात आणि किती गैरहजर होतात गैरहजर कर्मचार्यांवरती कारवाईची टांगती तलवार लागून राहिली आहे.