अमरावती (Amravati) :- विधानसभा सार्वञिक निवडणूक-२०२४ करीता मतदानाचा टक्का वाढावा म्हणुन जिल्हा स्वीप कक्षा व्दारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणुन शनिवार १६नोव्हेंबरला भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,अमरावती,जिल्हा परिषद अमरावती,अमरावती सारकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १०कीलो मिटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
मतदान जनजागृती साठी भव्य सायकल रॅली
या सायकल रॅलीची सुरुवात १६नोव्हेंबरला सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथुन सुरुवात करण्यात आली ही सायकल रॅली कलेक्टर ऑफिस , बियाणी, कमिश्नर ऑफीस , कांता नगर, पंचवटी, शेगाव नाका, काॅटन मार्केट रोड, चौधरी चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, रेल्वेपुलावरुन काँग्रेस नगर रोड हमालपूरा, रुख्मिणी नगर, गल्स हायस्कृल, शिवाजी नगर (राठी शाळा), जिल्हा स्टेडियम येथे समारोप झाला. आरोग्यासाठी सायकल, मतदान करेल भविष्य उज्वल हा संदेश देत. होय मी मतदान करणार हा संदेशाने अंबानगरी दणदणली. या करीता सायकलिंग असोसिएशन अमरावती (Amravati) यांनी पुढाकार घेतला होता.
अमरावती सायकलिंग असोसिएशन व जिल्हा स्वीप कक्षाचे आयोजन
या सायकल रॅली मध्ये निवडणूक निरीक्षक श्यामलाल पुनिया, लक्ष्मीशीजी, बिदानचंद्र चौधरी, बटूला गंगाधर, वेक्कंना तेजावत, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावतीचे सौरभ कटीयार, पोलिस, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापाञ, डीसीपी गणेश शिंदे, सागर पाटिल, मनपा आयुक्त सचिन कलंञे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, बिसवा रंजन मुंडासी, उपमुका अ.बाळासाहेब बायस, सुनिल जाधव,दिनेश, डाॅ.सुरेश आसोलेसह विविध खाते प्रमुख अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच अमरावती सायकलिंग असोसिशनचे पदाधिकारी डाॅ.चंद्रशेखर, कुलकर्णी, संजय मेडसे, डाॅ.सागर धानोरकर, अतुल कळमकर, प्रविण जयस्वाल, विजय धुर्वे,डाॅ. डफळे मॅडम, औषध निर्माण संघटनेचे अमोल वारकरी, शरद मुंडे, नितिन गुप्ता, शैलैश नाकडे, शिवा भैराणे, दिपक साव, अब्दुल रहेमान, अशोक कोठारी, प्रदिप बद्रे, दिपमाला बद्रे, डाॅ.श्याम राठी, राजेश गट्टाणी, या सायकल रॅलीत नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. तसेच औषध निर्माण अधिकारी संघटना जि. प. अमरावती व सुवर्णा एजन्सी, ग्लासीअर फार्मास्युरीलन, राजेश फार्माशीस यांनी सर्व सहभागी सायकल स्वारांना टि. शर्ट दिले.
निवडणूक निरीक्षक, निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी, पोलिस यांचा सहभाग
सायकल रॅली यशस्वी करण्याकरीता जिल्हा स्वीप कक्षाचे ज्ञानेश्वर घाटे,संजय राठी,राजेश सावरकर,श्रीकांत मेश्राम,नितिन माहोरे,हेमंतकुमार यावले,विशाल विघे,गजानन कोरडे,अतुल देशमुख व मनपा स्वीप कक्षाचे स्विप नोडल अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम ,मनपा शाळा निरीक्षक श्री योगेश पखाले ,हेमंत कुमार यावले ,प्रवीण ठाकरे , सोमेश वानखडे, उज्वल जाधव ,प्रवीण ठाकरे ,संजय बेलसरे,पंकज सपकाळ ,योगेश राणे,प्रवीण माहुलकर,पंकज सपकाळसह अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.चंद्रशेखर कुलकर्णी,उपाध्यक्ष संजय मेडसे,विजय धुर्वे,सागर धनोडकर कार्यकारिणी सदस्य संजय मेंडसे उपाध्यक्ष,अतुल कळमकर सचिव,प्रवीण जैस्वाल,डॉ सुरीता डफळे,राजुभाऊ देशमुख,जनसंपर्क अधिकारी प्रवीण खंडपासोळे व सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.