Published on
:
16 Nov 2024, 10:21 am
Updated on
:
16 Nov 2024, 10:21 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : सुखबीर सिंग बादल यांनी शिरोमणी अकाली दलाच्या (Shiromani Akali Dal) अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती पंजाबचे माजी शिक्षणमंत्री दलजीत चीमा यांनी Xपोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
पुढील निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी सुखबीर सिंग बादल यांनी शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज (दि.१६) पक्षाच्या कार्यकारिणीकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.च्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल आणि संपूर्ण कार्यकाळात मनापासून पाठिंबा आणि सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले असल्याचेही चीमा यांनी आपल्या X पोस्टमध्ये नमूद केले आहे.
The SAD President S Sukhbir Singh Badal submitted his resignation to the working Committee of the party today to pave the way for the election of new President. He thanked all the party leaders & workers for expressing confidence in his leadership and extending wholehearted…
— Dr Daljit S Cheema (@drcheemasad) November 16, 2024अकाली दल कार्यकारिणीचे अध्यक्ष बलविंदर सिंग भूंदर यांनी चंदीगड येथील पक्षाच्या मुख्यालयात सोमवारी दुपारी १२ वाजता कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलवली आहे. अकाली दलाच्या अध्यक्षपदासह पदाधिकारी आणि कार्यकारिणीच्या निवडणुका १४ डिसेंबरला होणार आहेत.