जेवनासाठी मिरचीचा खर्डा न केल्याने पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने वार:जखमी पत्नीची पतीविरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार

4 days ago 4
पत्नीने जेवणासाठी खर्डा न केल्याने पत्नीवर पतीने धारदार चाकूने वार करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात पत्नीने तक्रार दिल्यावर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सुप्रिया पंकज पाचारणे (वय 40, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे पती पंकज मच्छिंद्रनाथ पाचारणे (वय 43) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सुप्रिया यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पंकज रिक्षाचालक आहे. रविवारी सायंकाळी तो घरी आला. त्याने पत्नी सुप्रिया यांना मिरचीचा खर्डा करुन देण्यास सांगितले. तेव्हा तुम्ही मिरची घेऊन या. मी खर्डा करून देते, असे सुप्रियाने सांगितले. या कारणावरुन पंकज चिडला आणि त्यांच्या कानाखाली मारली. तेव्हा त्यांचा मुलगा आर्यनने भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वयंपाक घरातून चाकू आणला. आर्यनला मारण्यासाठी हातातील चाकू उगारला. झटापटीत सुप्रिया यांच्या डाव्या डोळ्याजवळ चाकू लागल्याने त्या जखमी झाल्या. पोलिस हवालदार तेजपाल तपास करत आहेत. किरकोळ वादातून टोकाची भांडणे होण्याच्याा घटना वाढीस लागल्या आहेत. अशाचप्रकरे नऱ्हे भागात शनिवारी मध्यरात्री एका हॉटेल अँड बार मध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुणाने मित्राच्या ताटात हात घातल्याने वाद झाला. त्यानंतर तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. पुण्यात सात ठाण्यात नवे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुणे पोलिस आयुक्तयालायात नव्याने सुरू झालेल्या सात पोलिस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्याची आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. सात नवीन पोलिस ठाण्यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने शहरात नवीन पोलिस ठाणे, तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा करण्यात आला होता. गृहविभागाने पुणे पोलिस आयुक्तालयात सात नवीन पोलिस ठाणे सुरु करण्यास मंजूरी दिली, तसेच 826 कर्मचारी उपलब्ध करून दिले. पोलिस ठाण्यांच्या इमारत उभारणीसाठी 60 कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही नवीन पोलिस ठाणे सुरू झाली. पोलिस ठाण्यांसाठी जागाही निश्चित करण्यात आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article