झिशान सिद्दीकी तातडीने सागर बंगल्यावर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, वडीलांच्या हत्येनंतर केली ही मोठी मागणी

2 hours ago 1

Zishan Siddiqui- Devendra Fadnavis : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आज त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वडीलांच्या हत्येनंतर त्याने मोठी मागणी केल्याचे समोर येत आहे. सलमान खान यांचा खास मित्र म्हणून सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा बिश्नोई गँगने केला आहे.

झिशान सिद्दीकी तातडीने सागर बंगल्यावर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, वडीलांच्या हत्येनंतर केली ही मोठी मागणी

झिशान फडणवीस यांच्यात भेट

| Updated on: Oct 18, 2024 | 2:29 PM

माजी मंत्री आणि काही दिवसांपूर्वी अजित पवार गटात दाखल झालेले बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या झाली. लॉरेन्स बिश्नोई गँगने ही हत्या केल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरणातील काही आरोपींची धरपकड केली आहे. त्यात संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोई गँगकडे जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आज त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वडीलांच्या हत्येनंतर त्याने मोठी मागणी केल्याचे समोर येत आहे.

सागर बंगल्यावर मोठी घडामोड

हे सुद्धा वाचा

थोड्या वेळापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तो भेट घेणार आहे. तर त्याचवेळी कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या दाव्यासाठी राणे सुद्धा सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. आताच्या वृत्तानुसार, अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल हे पण फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे या सर्वच प्रकरणासह वेगवान राजकीय घडामोड घडताना दिसत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article