टवाळखोरी करणाऱ्या 39 टवाळखोरांना पोलिसांचा हिसका:दामीनी पथकाची कारवाई

4 days ago 3
हिंगोली येथील दसरा महोत्सवात गर्दीचा गैरफायदा घेऊन टवाळखोरी व सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या ३९ जणांना पोलिस दलाच्या दामीनी पथकाने पोलिसी खाक्या दाखविला आहे. या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. हिंगोली येथील ऐतिहासीक दसरा महोत्सवातील कृषी व औद्योगिक प्रदर्शनीमध्ये दरवर्षी मोठी गर्दी होते. या गर्दीमध्ये महिला व मुलींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस विभागाने ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी साध्या वेशातील पाच चिडीमार पथके स्थापन केली होती. या शिवाय दामीनी पथकाच्या पोलिस निरीक्षक शालीनी नाईक, जमादार आरती साळवे, अर्चना नखाते, चंद्रशेखर देशमुख, चिलगर यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांत दसरा महोत्सवाच्या कृषी व औद्योगिक प्रदर्शनीमध्ये दररोज किमान ५० हजार पेक्षा अधिक नागरीक आले होते. या गर्दीचा गैरफायदा घेत काही टवाळखोर मुलींची छेड काढीत असल्याचे आढळून आले तर काही जण विनाकारण आरडा ओरड करून सार्वजनिक शांतता भंग करीत असल्याचे या पथकाला आढळून आले. या पथकाने सात दिवसांत तब्बल ३९ जणांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखविला. त्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना योग्य ती समज देऊन सोडून दिले. या शिवाय गर्दीमध्ये हरविलेली लहान मुले व मुली अशा सहा जणांना सुखरुपपणे त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यात आले आहे. दसरा महोत्सव आणखी तीन दिवस चालणार असून याठिकाणी सीसीटीव्ही सोबतच दामीनी पथक कार्यरत राहणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article