गेल्या काही दिवसापासून करुणा शर्मा या कायदेशीर लढाई लढत आहेत. काल वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना मोठा दिलासा दिला. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी द्यावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. आता यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर भाष्य केले आहे. “करुणा शर्मा या २५ हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार म्हणाल्या आहेत. त्यामुळे त्यांना पोलीस सुरक्षा दिली पाहिजे. कारण हे तिचाही घातपात करू शकतात”, असे धक्कादायक विधान अंजली दमानिया यांनी केले.
अंजली दमानिया यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. “धनंजय मुंडे याला कॅरेक्टर नाही, त्याला वाचवण्याचा प्रयत्न का केला जातो. तो व्यक्ती भ्रष्टाचारी हजारो शेकडे करून बसलेला आहे. जनतेची लूट केलेली आहे, कोटींचे स्कॅम केले आहेत, मग तरी का वाचवलं जातंय, मंत्री म्हणून का ठेवलं जातंय”, असा सवाल अंजली दमानियांनी केला आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा होणे गरजेचे
“एमएआयडीसी ही सरकारची बॉडी आहे. पण यांच्याकडून रेट कांट्रॅक्ट न करता, पंप पण विकत न घेता कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी १ हजार रुपये अतिरिक्त वाढ करून हे पंप विकत घेतले. जवळपास दोन लाख 36 हजार पंप त्यांनी विकत घेतलेले आहे. जवळपास साडेपाचशे कोटींच्या घोटाळा यामध्ये झालेला आहे. यासाठी त्यांचा राजीनामा होणे गरजेचे आहे”, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
“याप्रकरणी 70 टक्के पैसे गायब झालेले आहेत आणि या 70 टक्केच्या मनीऑर्डर कुठेही नाही. कारण बँकेचे पैसे गेलेले नाहीत. त्यामुळे 70 टक्के पैसे या नेत्यांच्या खिशात गेलेल्या हा जनतेचा पैसा आहे आणि घोटाळा मोठा झालेला आहे. तर त्यांच्या चौकशी लावावी. खरं खोटं होऊन जाऊ दे. सरकारचेच प्रमुख नेते धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मी आता उघड उघड दिसतंय”, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे सगळे का प्रयत्न करतात?
“इतक्या शिल्लक कारणावरून जर तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंडगिरी फोफावत असेल, मारहाण होत असेल तर हे भयंकर प्रकरण आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे व्हिडीओ पाहिले म्हणून झालेली मारहाण भयंकर प्रकरण आहे. कळकुटे तिथले स्थानिक पत्रकार आहे आणि त्यांनी व्हिडीओ तयार केलाय. ज्यांनी संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन केले होते, तो व्यक्ती त्या दिवसापासूनच गायब आहे आणि आता एक कोटी रुपयांचे तो घर बांधतो अशी माहिती मिळाली. तो कामावर देखील परत आलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेणे सुद्धा महत्त्वाचं ठरेल”, असाही आरोप अंजली दमानिया यांनी केला.
“करुणा मुंडे यांच्यासोबत डोमेस्टिक वायलेंस झालेला दिसतोय आणि हेच कोर्टाने सुद्धा पार्शली यस म्हटलेलं आहे. त्यांनी काल असे सांगितले की त्यांनी रूपाली चाकणकर यांच्याकडे देखील अर्ज केला होता आणि मदत मागितली होती. पण पॉलिटिकली किती मोठी ठेवायचं हा देखील मोठा प्रश्न आहे. धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे सगळे का प्रयत्न करतात हाच मूळ प्रश्न आहे. तुमच्या पक्षाचा माणूस म्हणून न्याय द्यायचा नाही ही भूमिका अत्यंत चुकीची”, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
“त्यांना सुरक्षा द्यायला हवी नाहीतर…”
धनंजय मुंडे याला कॅरेक्टर नाही. त्याला वाचवण्याचा प्रयत्न का केला जातो. तो व्यक्ती भ्रष्टाचारी हजारो शेकडे करून बसलेला आहे. जनतेची लूट केलेली आहे. कोटींचे स्कॅम केले आहेत. मग तरी का वाचवलं जातंय? मंत्री म्हणून का ठेवलं जातंय? त्यांनी काल जे जे आरोप केलेले त्यानुसार त्यांना पोलीस सुरक्षा दिली पाहिजे. कारण हे तिचाही घातपात करू शकतात. हे सगळं ऐकून भीती वाटते. २५ हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार म्हणाल्या आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षा द्यायला हवी नाहीतर त्यांना ही मारून टाकलं जाईल, अशी भीती अंजली दमानियांनी व्यक्त केली.