मतदानासाठी पक्षचिन्ह हे पक्षाचा चेहरा असतो. राष्ट्रवादी फुट फडल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले. तुतारी वाजवणारा माणूस असा त्यात आता बदल करण्यात आला आहे. लोकसभेत पिपाणीने तुतारीसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. थोरल्या पवारांना त्याचा फटका बसला होता. लोकसभेत नुकसान सहन करावं लागलं होतं. आता विधानसभेतील 163 जागांवर अपक्षांनी पवार गटाची अशीच झोप उडवली होती. त्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमने-सामने आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर तोंडसुख घेतले आहे.
लोकसभेत असा झाला खेला
यंदा झालेल्या लोकसभा मतदारसंघात पिपाणीने तुतारीला चांगलेच जेरीस आणले होते. चिन्ह साधर्म्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला होता. अनेक मतदारांनी तुतारी ऐवजी पिपाणीला भरभरून मतदान केले, ते संभ्रमामुळे केल्याचा दावा शरद पवार गटाने केला. शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, अहिल्यानगर, बीड या मतदारसंघात पिपाणीला पसंती मिळाल्याचे दिसून आले. आता तोच डाव विधानसभा निवडणुकीत आखण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा
सुप्रिया सुळे यांचा भाजपावर निशाणा
विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 163 जागांवर अपक्ष उमेदवारांचे निवडणूक चिन्ह पिपाणी आहे. हे चिन्ह देऊन भाजपाने रडीचा डाव खेळल्याचा घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत, निवडणूक आयोगाने चिन्हाच्या नावामध्ये अपेक्षित बदल न केल्याने सातऱ्यामध्ये युतीचा उमेदवार विजयी झाला, त्याची कबुली स्वत: अजित पवार यांनी दिल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावरून भाजपा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप सुळे यांनी केला आहे.
पवारांवर टीका केल्याने महागाई सुटणार का?
शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय भाजपवाल्यांना चैन पडत नाही. त्यामुळेच ते टीका करतात. पण पवारांवर टीका करून महागाईचा प्रश्न सुटणार नाही. भाजपाकडे आता सांगण्यासारखं काही उरलं नाही. त्यामुळे ते पवार यांच्यावर टीका करत आहेत. बारामतीमध्ये दादा कोण हे जनात ठरवेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.