Sanjay Raut connected Mahayuti : राज ठाकरे यांनी वरळीत पक्षाच्या मेळाव्यात मत गायब झाल्याचा मुद्दा आणल्यानंतर पुन्हा EVM ने राजकारणात एंट्री केली आहे. खासदार संजय राऊत यांनी हाच धागा पकडून महायुती सरकारवर तोंडसुख घेतले आहे.
संजय राऊतांचा तिरकस बाण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला तर विधानसभेत एकला चलो रेची भूमिका घेतली. त्यानंतर काल परवा वरळीत पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी अनेक उमेदवारांची मत गायब झाल्याचा मुद्दा समोर आणला. पूर्वी ज्या ठिकाणी हजर मत मिळायची तिथे एक सुद्धा मत मिळाल्याचा सूर त्यांनी आळवला. नेमका तोच धागा पकडत खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर तोंडसुख घेतले. सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ईव्हीएमचा उल्लेख न करता महायुतीच्या महाविजयावर पुन्हा आक्षेप घेतला. कालच सामन्यातून ईव्हीएमला कुंभमेळ्यात शाही स्नान घालून पापमुक्त करण्याचा तिरकस बाण सोडण्यात आला होता.
बातमी अपडेट होत आहे…